|Monday, January 27, 2020
You are here: Home » leadingnews » राष्ट्रपती निवडणूक ; रालोआचे रामनाथ कोविंद आघाडीवर

राष्ट्रपती निवडणूक ; रालोआचे रामनाथ कोविंद आघाडीवर 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

भारताच्या 14 व्या राष्ट्रपतिपदाच्या मतमोजणीला सकाळी अकरा वाजता सुरुवात झाली आहे. या मतमोजणीच्या सुरुवातीलाच राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी आघाडी घेतली आहे.

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत रामनाथ कोविंद आणि विरोधी पक्षांच्या उमेदवार माजी लोकसभाध्यक्ष मीरा कुमार यांच्यात लढत होत आहे. या निवडणुकांचे मतदान 17 जुलैला पार पडले. त्यानंतर आज मतमोजणी सुरु आहे. मतमोजणीला सकाळी अकरा वाजल्यापासून सुरुवात झाली. पहिल्या फेरीत कोविंद यांना 60 हजार 683 मते मिळाली आहेत. मीरा कुमार यांना 22 हजार 941 मते मिळाली आहेत. संपूर्ण मतमोजणी सायंकाळी 5 वाजेपर्यंत पूर्ण होणार असून, त्यानंतरच देशाचे 14 वे राष्ट्रपती कोण हे स्पष्ट होईल.

Related posts: