|Thursday, February 27, 2020
You are here: Home » leadingnews » राष्ट्रपतिपदी रालोआचे रामनाथ कोविंद

राष्ट्रपतिपदी रालोआचे रामनाथ कोविंद 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद यांचा विजय झाला आहे. कोविंद हे देशाचे 14 वे राष्ट्रपती असणार आहेत. येत्या 25 जुलैला कोविंद यांचा शपथविधी होणार आहे.

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पदाचा कार्यकाळ 25 जुलैला पूर्ण होत आहे. त्यामुळे या रिक्त होणाऱया जागेसाठी 17 जुलैला मतदान झाले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून रामनाथ कोविंद यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर विरोधी पक्षांकडून माजी लोकसभाध्यक्षा मीरा कुमार यांना उमेदवारी देण्यात आली होती. आज सकाळी अकरा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच कोविंद हे आघाडीवर होते. ही मतमोजणी पूर्ण झाली.

यामध्ये कोविंद यांना 7 लाख 2 हजार 44 मते मिळाली तर मीरा पुमार यांना 3 लाख 67 हजार 314 मते मिळाली आहेत.

 

Related posts: