|Friday, November 15, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » एनएसए अजित डोभाल जाणार चीन दौऱयावर

एनएसए अजित डोभाल जाणार चीन दौऱयावर 

वृत्तसंस्था /नवी दिल्ली :
चीनसोबत तणावादरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल हे ब्रिक्स देशांच्या बैठकीत भाग घेण्यासाठी बीजिंगला जाणार आहेत. गुरुवारी पत्रकार परिषदेत विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाळ बगळे यांनी याची माहिती दिली.
चीनसोबत मुत्सद्देगिरीचे मार्ग खुले असून याप्रकरणी भारताच्या भूमिकेत सातत्य आहे. आम्ही सातत्याने चर्चेवर भर देत असून याप्रकरणी संवेदनशील माहिती उघड केली जाऊ शकत नाही. चीनसोबत सैन्यविषयक तणावाप्रकरणी जगभराच्या नेत्यांसोबत भारत चर्चा करतोय. चीनसोबत सीमावादाशी संबंधित प्रत्येक मुद्यावर शांततापूर्ण तोडगा काढण्याचा भारताचा प्रयत्न असल्याचे बगळे म्हणाले.
भारत आणि चीनदरम्यान कोणत्याही प्रकारच्या मतभेदाला वादाचा विषय होऊ देऊ नये. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ब्रिक्स देशांच्या संमेलनात भाग घेण्यासाठी निर्धारित कार्यक्रमानुसारच जातील. भूतानसोबत आमचे सांस्कृतिक नाते असून त्या मुद्यावर चीनकडून आम्हाला कोणताही धोका नाही. चीनसोबतचा वाद सोडविण्यासाठी राजनैतिक पद्धतीने चर्चा होईल असे बगळे यांनी स्पष्ट केले.
ब्रिक्स बैठक
चीनच्या बीजिंग शहरात 27 जुलै ते 28 जुलैपर्यंत ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक होणार आहे. चीनचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांग जेइची यांच्याकडे या बैठकीचे अध्यक्षपद असून डोभाल यात सहभागी होतील.

Related posts: