|Monday, February 17, 2020
You are here: Home » Top News » ममता करणार ‘भारत छोडो भाजपा’ आंदोलन

ममता करणार ‘भारत छोडो भाजपा’ आंदोलन 

वृत्तसंस्था/ कोलकाता

राज्यातील भाजपाच्या वाढत्या शक्तिने चिंतेत असणाऱया ममता बॅनर्जी यांनी ‘भारत छोडो भाजपा’ आंदोलनाची शुक्रवारी घोषर्णी केली. एतिहासिक ‘भारत छोडो आंदोलनाच्या जयंतीचे मुहूर्त साधत म्हणजे 8 ऑगस्ट रोजी सुरू होणारे हे आंदोलन  30 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे.

तृणमूल कॉग्रेसकडून आयोजित वार्षिक शहीद प्रभात फेरी दरम्यान ममता बॅनर्जीनी ही घोषणा केली. 21 जूलै 1993 रोजी एका राजकीय आंदोलनावेळी पोलिसांच्या गोळीबारात पश्चिम बंगालमध्ये 13 पक्ष कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या स्मरणार्थ ममता दरवर्षी ‘शहीद दिवस’ म्हणून आचरतात. यावेळी केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षावर त्यांनी जोरदार हल्ला चढवला. भाजपाविरोधातील 18 विरोधी पक्षांच्या गठबंधनाचे भविष्यात आणखी विस्तार करण्यात येईल. तसेच लोकसभा निवडणुकीनंतर हिंदुत्ववादी पक्ष सत्तेवरून पायउतार होईल असा दावा ही त्यांनी यावेळी केला.

Related posts: