|Friday, May 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कॉन्स्टेबल किशोरच्या मृत्यूचे गूढ कायम

कॉन्स्टेबल किशोरच्या मृत्यूचे गूढ कायम 

 

प्रतिनिधी/ पणजी

भारतीय राखीव पोलीस दलातील (आयआरबी) किशोर शिरोडकर याने आत्महत्या करणे शक्यच नाही. त्याचा घातपातच केला आहे, असा दावा किशोर याच्या कुटुंबियांनी केला आहे. किशोरच्या कुटुंबियांनी काल शुक्रवारी पर्वरी पोलीस निरीक्षक परेश नाईक यांची भेट घेतली. या प्रकरणाचा सखोल तपास करा आणि आम्हाला न्याय द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे.

कॉन्स्टेबल किशोर शिरोडकर याच्या मृत्यूचे गूढ कायम असून, आत्महत्या की घातपात ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. शवचिकित्स अहवालानुसार आत्महत्या असे दिसत असले तरी काही प्रश्न अनुत्तरीत आहेत. त्यामुळे किशोरचा घातपात केला असल्याचा संशय किशोरच्या कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. त्याचे सगळे काही सुरळीत चालले होते. गोजीरवाणी अशी दोन मुले आहेत. असे सगळे असताना किशोर आत्महत्या का करेल असे अनेक प्रश्न कुटुंबियांनी उपस्थित केले आहेत.

तक्रार आल्यास पुढील तपास करु

सध्या अनैसर्गिक मृत्यू म्हणून घटनेची नोंद करण्यात आली आहे.  कुटुंबियांकडून तक्रार आल्यास खून प्रकरण म्हणून नोंद करून पुढील तपास केला जाईल, असे पोलीस निरीक्षक परेश नाईक यांनी सांगितले. किशोर हा सुकूर येथे त्याच्या सासरवाडीच्या गावात भाडय़ाच्या घरात राहत होता. काही गोष्टी ज्या किशोरच्या कुटुंबियाना माहिती नसतील त्या गोष्टी त्याच्या बायकोला माहीत असणे शक्य आहे. तिच्याशी बोलल्यानंतरच अनेक गोष्टींचा उलघडा होईल. घातपात की आत्महत्या हे ठरविणे सोपे जाईल. सध्या तिची मनस्थिती ठिक नसल्याने तिच्याशी बोलणे उचित होणार नाही, असे निरीक्षक परेश नाईक यांनी सांगितले.

किशोरच्या मोबाईलची तपासणी

मयत किशोर शिरोडकर याची बायको पॅसिनोत नोकरी करीत आहे. बुधवारी संध्याकाळी 3 वाजता तो बायकोला सोडण्यासाठी गेला होता. रात्री 11 वाजतो तो बायकोला आणण्यासाठी जाणार होता, मात्र गेलाच नाही. बुधवारी रात्री 9.30 च्या दरम्यान त्याचे मोबाईल फोन लोकेशन सांत इनेझला मिळाले आहे. तर रात्री 1 च्या सुमारास इंटरनेट कॉल केल्याचे त्याच्याकडे असलेल्या मोबाई

मारवाडय़ाने दिली होती धमकी

किशोर शिरोडकर याने कळंगुट येथील एका मारवाडय़ाकडून पैसे घेतले  होते. ते परत न केल्यामुळे तो मारवाडी किशोर राहत असलेल्या घरी आला होता.  वेळेत पैसे दिले नाही तर तुला काय ते दाखवतो, अशी धमकी त्याने दिली होती. असे किशोर शिरोडकर याच्या मेहुण्याने पोलिसांना सांगितले आहे. त्या मारवाडय़ाबाबत पोलिसांनी विचारले असता आपण त्याला ओळखत नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. किशोरने खरोखरच कर्ज घेतले होते की नाही हाही एक प्रश्नच आहे.

Related posts: