|Tuesday, November 19, 2019
You are here: Home » leadingnews » बसपाची उद्या दिल्लीत बैठक ; पुढील रणनीती ठरवणार

बसपाची उद्या दिल्लीत बैठक ; पुढील रणनीती ठरवणार 

ऑनलाईन टीम / लखनौ :

राज्यसभा सदस्यत्त्वाचा राजीनामा दिल्यानंतर बहुजन समाजवादी पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी उद्या दिल्ली येथे पक्षाच्या सर्व नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत बसपाची पुढील रणनीती ठरवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

उत्तर प्रदेशमध्ये दलितांवर होणाऱया अत्याचाराच्या मुद्यावर राज्यसभेत आपल्या बोलू दिले जात नसल्याने निराश झालेल्या मायावती यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला. राज्यसभा अध्यक्ष हमीद अन्सारी यांनी गुरुवारी मायावती यांचा राजीनामा स्वीकारला. त्यानंतर बहुजन समाजवादी पक्षाकडून पुढील रणनीती ठरवण्यासाठी उत्तर प्रदेशसह विविध राज्यांतील खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष यांसारख्या प्रमुख पदाधिकाऱयांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत मायावती नवी घोषणा करण्याची शक्यता व्यक्त होत आहेत.

Related posts: