|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » इस्लामिक स्टेट म्होरक्या बगदादी अजूनही जिवंत

इस्लामिक स्टेट म्होरक्या बगदादी अजूनही जिवंत 

वॉशिंग्टन

इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू बकर अल-बगदादी अजूनही जिवंत असल्याचे सांगत अमेरिकेचे संरक्षण मंत्री जेम्स मॅटिस यांनी बगदादी ठार झाल्याचा प्रसारमाध्यमांचा दावा फेटाळला. बगदादी जिवंत असल्याचे माझे मानणे आहे. आम्ही त्याला ज्यावेळी मारू, तेव्हाच तो मेल्याचे मी मान्य करेन. अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणा बगदादीचा शोध घेत आहेत. बगदादी अजूनही दहशतवादी संघटनेत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे मॅटिस म्हणाले.  सीरियाच्या रक्कानजीक 28 मे रोजी बगदादी मारला गेल्याचा दावा रशियन सैन्याने केला होता. तर काही प्रसारमाध्यमांनुसार बगदादी इराकमध्ये ठार झाला आहे. परंतु 2014 पासून बगदादीला सार्वजनिकरित्या कधीच पाहिले गेले नाही.

 परंतु या काळात त्याच्या ध्वनिफिती समोर आल्या होत्या. बगदादीवर 25 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 160 कोटी रुपयांचे इनाम ठेवण्यात आले आहे. सप्टेंबर 2014 आणि एप्रिल 2015 मध्ये देखील तो मारला गेल्याचा दावा करण्यात आला होता. 18 मार्च 2015 रोजी झालेल्या हवाईहल्ल्यात तो गंभीर जखमी झाल्याचे वृत्त प्रकाशित झाले होते.

Related posts: