|Sunday, January 26, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » येणेचंवडी तलाव पुनर्भरण कामास सुरवात

येणेचंवडी तलाव पुनर्भरण कामास सुरवात 

प्रतिनीधी / गडहिंग्लज

गडहिंग्लज तालुक्यातील पुर्व भागातील पावसाचे प्रमाण फारच कमी असून जुलैमध्ये थोडाफार पाऊस पडला आहे. पाऊस नसल्याने येणेचवंडी तलावात पाणीसाठा अतिशय कमी झाल्याने पाण्याची चिंता वाढली आहे. भविष्यातील अडचण समजून गावातील शेतकऱयांनी धरणाच्या खालील बाजूस असलेल्या नाल्यामधील पावसाचे वाहते पाणी लोकसहभागतून स्वतःचे विद्युत मोटारीने उपसाकरून तलावात सोडण्यास सुरू केले आहे. तालुक्यातील पहिला प्रयत्न असल्याने याची चर्चा होताना दिसते आहे.

येणेचवंडी तलावात नाल्याचे उपसाव्दारे सुरू असणाऱया पाण्याची पाहणी प्रांतधिकारी संगीता राजापुरकर-चौगुले, तहसिलदार राजेश चव्हाण, मंडल अधिकारी दिलीप जाधव यांनी धरणावर येवून केली. या कामाच्या यशाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. याभेटी दरम्यान पाटबंधारे खात्याचे शाखाधिकारी तुषार पवार यांनी या प्रयत्नबाबत माहिती दिली. त्यावर प्रांतधिकारी चौगुले यांनी येणेचवंडी तलावाप्रमाणे इतर ठिकाणी पाणीसाठा वाढवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. शाखाधिकरी तुषार पवार, सरपंच रावसाहेब पाटील, तानाजी कुराडे, यांनी शिवारातील पावसाचे वाया जाणारे पाणी रस्त्याच्या कडेला जेसीबीच्या साहय़ाने चर खोदून ते पाणी धरणामध्ये वळविण्याचे काम केले आहे. त्याचबरोबर परसू भोसले, सचिन राउत, रविंद्र राउत, मदन लोंढे, रामकृष्ण शिंदे, राहूल भोसले, सतिश पाटील, उमाजी बिरंजे, कृष्णा राउत, सतोंष कुराडे, के. के. पाटील यांनी सहकार्य केल्याचे सांगण्यात आले.

 

Related posts: