|Thursday, January 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » कर्ज पुनर्गठण केलेल्या शेतकऱयांबाबत सकारात्मकता

कर्ज पुनर्गठण केलेल्या शेतकऱयांबाबत सकारात्मकता 

प्रतिनिधी सांगली

कर्जाचे पुनर्गठण केलेल्या शेतकऱयांसाठी शासन सकारात्मक विचार करीत असल्याची घोषणा पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी शनिवारी सांगलीमध्ये बोलताना केली. खरिपासाठी शेतकऱयांना तातडीची मदत म्हणून दहा हजार रूपये देण्यात येत असून या मदतीसाठी काही बँका जाणूनबुजुन राजकारणासाठी अडवणूक करीत असतील तर अशा बँकांवर कडक कारवाई करण्याचा इशारा पालमंत्र्यांनी यावेळी दिला. शेतकरी कर्जमाफीची अफवा पसरवू नये, अपात्रांना याचा लाभ होऊ नये यासाठी बारकावे बघितले जात असून कर्जदार शेतकऱयांची संपूर्ण माहिती घेऊन छाननीचे काम सुरू आहे. योग्य आणि पात्र शेतकऱयांना लवकरच कर्जमाफीचा लाभ दिला जाणार असल्याचेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.

भाजपा जिल्हा कार्यकारिणीची बैठक येथील टिळक स्मारक येथे झाली यावेळी पालकमंत्री बोलत होते. केंद्रांची मदत न घेता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकरी कर्जमाफीचा धाडशी निर्णय घेतला सर्वात मोठा निर्णय आहे. यामुळे तब्बल 89 लाख कर्जदार शेतकऱयांपैकी 36 हजार शेतकऱयांचा सातबारा कोरा होणार आहे. ओटीस योजनेखाली दीड ते दोन लाख रूपये कर्ज असलेल्या शेतकऱयांनी 50 हजार भरल्यास बाकीची रक्कम शासन भरेल यामुळे आणखी सहा लाख शेतकऱयांचा सातबारा कोरा होईल, असे सांगून पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, कर्जाचे पुनर्गठण केलेल्या शेतकऱयांना सध्या जास्तीत जास्त पंचवीस हजार किंवा कर्जाच्या 25 टक्के रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे मात्र त्यांनी थकबाकी असल्याशिवाय पुन्हा पीक कर्ज घेतले नाही.

त्यामुळे त्यांना आणखी मदत करण्याबाबत शासन विचार करीत आहे. शेतकऱयांना खरीप हंगामासाठी तातडीने मदत व्हावी यासाठी शासनाने दहा हजार देण्याचा निर्णय घेतला मात्र याला प्रतिसाद मिळत नाही याला दोन्ही बाजूची कारणे असतील मात्र अनेक बँकां यामध्ये सहभागी होत नसल्याच्या तक्रारी आहेत. राजकरणासाठी जाणीवपूर्वक शेतकऱयांची अडवणूक करणाऱया बँकांवर कारवाई केली जाईल, गरिबांची अडवणूक करणाऱयांला सोडणार नाही असा इशारा ही यावेळी पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी दिला.

 कर्जमाफीबाबत शेतकऱयांमध्ये संभ्रम आणि अफवा फसरविल्या जात असल्याबाबत बोलताना ते म्हणाले, सन 2008-09 मध्ये केंद्राने कर्जमाफी केली मात्र यावेळी अपात्र शेतकऱयांना मोठा लाभ झाला, कोल्हापूर जिल्हय़ात असा प्रकार अधिक झाला. त्यामुळे पुन्हा तसे होऊ नये पात्र शेतकऱयांनाच याचा लाभ व्हावा यासाठी शेतकऱयांची संपूर्ण माहिती घेऊन त्याची छाननी सुरू आहे. 34 हजार शेतकरी असल्याने याला वेळ लागत आहे. शेतकऱयांना त्रास होऊ नये तसेच गरजूंनाच आणि पात्र शेतकऱयांना याचा लाभ व्हावा यासाठी बारकावे बघितले जात आहेत. लवकरात लवकर हे काम पूर्ण करून कर्जमाफी देण्यात येईल जेणेकरून शेतकऱयांना पुन्हा कर्ज घेता येईल.

 

Related posts: