|Friday, November 15, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » मोदी विरुद्ध माया, ममता, सोनिया

मोदी विरुद्ध माया, ममता, सोनिया 

विरोधी पक्षांवर कसा वचक ठेवायचा  हे मोदींना चांगलेच ठाऊक आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना माहिती आणि नभोवाणी मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार देऊन त्यांनी एकप्रकारे मुलुख मैदान तोफच मैदानात आणली आहे.त्या मोदींसारख्याच आक्रमक  आहेत. सरकारच्या प्रमुख प्रवक्त्या झाल्याने विरोधी पक्षांबरोबरील संघर्ष वाढला तर नवल वाटणार नाही. इराणी यांना अमेठी-रायबरेलीमध्ये सक्रिय करून गांधी-नेहरू घराण्याला हादरे देण्यास सुरुवात झाली आहे.

 

“मरता क्मया नही करता?’’ अशी एक हिंदी म्हण आहे. मायावतीनी गेल्या आठवडय़ात दलितांवरील वाढत्या अत्याचाराच्या मुद्यावरून राज्यसभेतून राजीनामा दिला त्याने या म्हणीची आठवण व्हावी. तीस वर्षांपूर्वी दलितांचा बंडखोर आवाज म्हणून उत्तरप्रदेशात उदयास आलेल्या बहुजन समाज पक्षाचा नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पालापाचोळा झाला आहे. 2014 च्या मोदी लाटेत तर पक्षाचा कचराच झाला होता. त्याला भोपळा मिळाला होता. 2007 साली मायावतींनी उत्तरप्रदेशात स्वबळावर सत्ता प्राप्त केली होती. त्या घटनेला ‘भारतीय राजकारणातील एक निर्णायक क्षण’ मानले जाते. पण अवघ्या दहा वर्षात अशी अवस्था झाली आहे की त्यांचा पक्ष राहतो की जातो. मायावतींची राज्यसभेतील टर्म अवघ्या आठ महिन्यात संपत आहे. त्यांना परत निवडून येण्याची आशा नाही. कारण 403 सदस्यीय उत्तरप्रदेश विधानसभेत बसप फक्त 16 जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत त्यांची रणनीती फक्त चुकली नाही तर समाजवादी पक्ष आणि बसपने एकप्रकारे भाजपची हिंदुत्वाची मतपेटी मजबूत केली. मायावतींनी जवळजवळ 10 मुस्लीम उमेदवार मैदानात उतरवून स्वत:ला दलित आणि मुस्लिमांचा कैवारी म्हणून प्रचार केला. अखिलेश आणि काँग्रेसनेही मुस्लीम समाजाला भरपूर तिकिटे देऊन मायावतींना काटशह दिला होता. पण झाले भलतेच. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी ओम माथुर यांच्या नेतृत्वाखाली एक टीम उत्तरप्रदेशात गेली तीन वर्षे कार्यरत ठेवली होती. या टीमने प्रत्येक मतदारसंघाचा बारकाईने अभ्यास करून विरोधकांना कुठे कसे लोळवायचे याची रूपरेषाच तयार केली होती. माया आणि अखिलेशच्या रणनीतीने भाजपलाच खतपाणी मिळाले. भाजपने एकही मुस्लीम उमेदवार मैदानात उतरवला नाही.माया-मुलायम-अखिलेश-राहुल यांचा कचरा झाला नसताच तर नवल होते. आता मायावती परत एकदा नव्या दमाने तयारीला लागत आहेत. त्यापुढील वर्षभरात भाजपला कसे जेरीला आणतात व विरोधी पक्षांचे ऐक्मय कसे वाढवतात त्यावर देशातील सर्वात मोठा दलित नेता हे त्यांचे पद अवलंबून आहे.

ममतादीदींचे ‘भाजप भारत छोडो’

आजमितीला मोदी आणि भाजपशी कडवेपणे कोण दोन हात करत असेल तर त्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या होत. 33 वर्षाची मार्क्सवाद्यांची राज्यामधील सत्ता एक हाती उलथवणाऱया त्यांना सध्या भाजपने सळो की पळो केलेले आहे. शारदा व नारदा घोटाळय़ांमध्ये तृणमूल काँग्रेसचे बरेच नेते अडकले असल्याने त्यांची पंचाईत झाली आहे. दुसरीकडे ममतांना मुस्लीमधार्जिणे हिणवून भाजप राज्यात मोठय़ा प्रमाणावर हिंदुत्वाचे राजकारण करत आहे. ध्रुवीकरणाच्या या रणनीतीमुळे डावे पक्ष तसेच काँग्रेस हादरली आहे. ‘कानामागून आला आणि तिखट झाला’ अशी त्यांची भाजपविषयी भावना आहे. 2021 झाली होणाऱया विधानसभा निवडणुकीत बंगालमध्ये आपल्याला सुपीक रान आहे. अशी आशा भाजपला अचानक वाटू लागली आहे. त्यामुळे रान पेटवणे भाजपने सुरू केले आहे. त्याच्या या डावाला प्रत्युत्तर म्हणूनच ममता आता जास्त आक्रमक झाल्या आहेत. 9 ऑगस्ट या ऐतिहासिक दिवसाचा मुहूर्त साधून ‘भाजप भारत छोडो’ अभियान त्या महिनाभर राबवणार आहेत. 2019 मध्ये नरेंद्र मोदींशी दोन हात करण्याची देखील त्यांनी तयारी चालवली आहे. महत्वाकांक्षी ममतांना विरोधी पक्षांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार होण्याची इच्छा आहे. ही इच्छा कितपत सफल होईल हा भाग वेगळा पण सध्यातरी त्यांचे प्रयत्न त्याच दिशेला सुरू आहेत. ‘मोदी’ना धडा शिकवायचा असेल तर तो ममतादीदीच शिकवू शकतात, ते ऐऱयागैऱयाचे काम नाही’ असे तृणमूल काँग्रेसचे नेते म्हणतात. राहुल गांधी यांना अजून बरेच कच्चे आहेत असाच याचा अर्थ होय. नितीश कुमार यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत केलेल्या फितुरीमुळे त्यांची प्रतिमा मलीन झाली आहे. सध्या बिहारमध्ये सत्ताधारी आघाडीत सुरू असलेल्या कलगीतुऱयाने नितीश अचानक भाजपकडे देखील जातील अशी शंका विरोधी नेत्यांना पछाडले आहे.

सोनियांचा संकल्प

आपल्या आत्तापर्यंतच्या राजकीय जीवनात सोनियांना सर्वात कोणती गोष्ट बोचत आहे ती म्हणजे त्या काँग्रेस अध्यक्ष असताना पक्षाला सर्वात कमी म्हणजे अवघ्या 44 जागा गेल्या लोकसभा निवडणुकीत मिळाल्या ‘आपण नेतृत्व करत असताना काँग्रेसचा असा प्रादेशिक पक्ष कसा बरे झाला’ हा सवाल त्यांना गेली तीन वर्षे छळत आहे. जवळच्या लोकांसमोर त्या ही खंत बोलूनही दाखवत आहेत असे म्हणतात. अशावेळी विरोधी पक्षांचे ऐक्मय बनवण्याच्या गंभीर प्रयत्नात आहेत.  2004 साली संयुक्त प्रगतीशील आघाडीची नैया सांभाळणाऱया सोनियांना काँग्रेसला विजयी करून निवृत्त व्हावयाचे आहे.पण ही बाब वाटते तेवढी सोपी नाही. मोदी आणि त्यांचे सरकार हे विरोधकांच्या मागे हात धुवून लागले आहे. गुजरातमध्ये शंकरसिंह वाघेला अचानक काँग्रेस सोडून गेलेले नाहीत. त्यांच्या मागे केंद्रीय एजन्सीजच्या चौकशांचा ससेमिरा लावला गेला होता. गुजरातमध्ये भाजपला सत्ता राखायची असेल तर काँग्रेसला कमकुवत करणे जरुरीचे होते. तात्पर्य काय तर विरोधी पक्षांची लढाई अवघड आहे आणि दिवसेंदिवस ती कठीण होत आहे.

इराणींना जबाबदारी

पंतप्रधान शांत बसलेले नाहीत. विरोधी पक्षांवर कसा वचक ठेवायचा हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना माहिती आणि नभोवाणी मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार देऊन त्यांनी एकप्रकारे मुलुख मैदान तोफच मैदानात आणली आहे. त्या  मोदींसारख्याच आक्रमक असल्यान व सरकारच्या प्रमुख प्रवक्त्या झाल्याने विरोधी पक्षांबरोबरील संघर्ष वाढला तर नवल वाटणार नाही. इराणी यांना अमेठी-रायबरेलीमध्ये सक्रिय करून गांधी-नेहरू घराण्याला हादरे देण्यास सुरुवात झाली आहे. अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची त्वरित सुनावणी होण्यासाठी मोदींनी सुब्रमण्यम स्वामींना कामाला लावले आहे. विरोधी पक्षांची एकजूट तोडण्यासाठी नितीशकुमारांना कसे गळाला लावायचे याबाबत भाजपमध्ये खल सुरू असताना मोदींच्या पाठीत खंजीर खुपसलल्या नितीशना  मुळीच थारा देऊ नये असाही मतप्रवाह आहे.

 राजकीयदृष्टय़ा संपवावे,’ असे एक गट म्हणत आहे. तर दुसरा गट नितीशचा ‘मामा’ बनवण्याबाबत आग्रह धरतोय. “महाराष्ट्रात शिवसेनेला जसे भाजपने वठणीवर आणले तसे बिहारमध्ये युती करून नितीशना वठणीवर आणावे’’ असा दुसऱया गटाला आग्रह आहे.

विरोधी पक्षात देखील जोपर्यंत नितीश-लालू, मायावती-अखिलेश असे प्रादेशिक नेते एकत्र येत नाहीत तोवर मोदींना टक्कर देता येणार नाही याचे भान वाढत आहे.

Related posts: