|Friday, November 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » सांबरा विमानतळ कॉलनीत वृक्षारोपण

सांबरा विमानतळ कॉलनीत वृक्षारोपण 

वार्ताहर/ सांबरा

भारतीय विमानतळ प्राधिकरण व भाऊराव काकतकर कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सांबरा येथील एअरपोर्ट कॉलनीमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महापौर संज्योत बांदेकर, उपमहापौर नागेश मंडोळकर, भाऊराव काकतकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एन. मिसाळे, राणी चन्नम्मा युनिव्हर्सिटीचे को-ऑर्डिनेटर डॉ. एस. ओ. हलसगी, राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी प्रा. डॉ. अमित चिंगळी आदी उपस्थित होते. खासदार सुरेश अंगडी यांनीही नंतर हजेरी लावली.

प्रारंभी विमानतळ संचालक राजेशकुमार मौर्य यांनी सर्वांचे स्वागत करून वृक्षारोपणाचा उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर एअरपोर्ट कॉलनी परिसरात सिसम, सागवान, जांभूळ, फणस, बदाम, मत्ती, पिंपळ, कडुलिंब, आवळय़ासह वेगवेगळय़ा जातीची सुमारे दोनशेहून अधिक रोपे लावण्यात आली.

वृक्षारोपण कार्यक्रम वायुदलाचे विंग कमांडर, बँक ऑफ बडोद्याचे मॅनेजर, विमानतळ प्राधिकरणचे सर्व अधिकारी, स्पाईस जेटचे अधिकारी, केआयएसएफचे जवान व विमानतळावरील पोलीस व एनएसएसचे चाळीस विद्यार्थी यासह सुमारे दीडशे नागरिकांनी भाग घेऊन वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी केला.

चौकशी सुरू झाल्याने धास्ती

विमानतळाच्या निकृष्ट कामाबद्दल तरुण भारतने सातत्याने आवाज उठविला आहे. त्यामुळे धास्तावलेल्या अधिकाऱयांनी या कार्यक्रमात आपला संताप व्यक्त केला. यावेळी अधिकाऱयांनी तरुण भारत वार्ताहराला दादागिरी करण्याचा प्रयत्न केला. तरुण भारतने अशा प्रकारचे वृत्त प्रसिद्ध केल्यामुळे स्तरावरून चौकशी सुरू झाल्यानेच हा धसका घेतला आहे, याची चर्चा उपस्थितांमधून झाली.   

 

Related posts: