|Tuesday, November 12, 2019
You are here: Home » leadingnews » विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात 

ऑनलाईन टीम / मुंबई :

राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. शेतकऱयांच्या कर्जमाफीवरून विरोधकांनी सरकारला घेरण्याची रणनीती आखली आहे. कर्जमाफीसाठी सरकारे आधीच यादी जाहीर केली असताना अर्ज घेण्याची गरज काय? असा सवाल विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.

अधिवेशनाच्या आदल्या दिवशी परंपरेनुसार मुख्यमंत्र्यांनी विरोधीपक्षाला चहापानासाठी निमंत्रित केले होते.मात्र विरोधीपक्षांनी वेगवेगळय़ा बैठका घेऊन चहापानावर बहिष्कार टाकला. इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्षाने वेगवेगळी बैठक घेतली. ‘दोन्ही विरोधी पक्षांनी दिलेले पत्र सारखेच आहे. कुठलाही नवीन मुद्दा विरोधकांनी मांडला नाही. विरोधकच आपापसात भांडत आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 

Related posts: