|Thursday, January 23, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » मलिष्काच्या गाण्यामागे झोल झोल!

मलिष्काच्या गाण्यामागे झोल झोल! 

मलिष्का प्रकरणात मुंबई पालिकेनेही आपले कुठे चुकते त्याबाबत आत्मपरीक्षण करावे. मलिष्काने हे असे गाणे सादर का केले, त्यामागे कोणी आहे का, याप्रकरणात कोणी उगाचच राजकारण करीत आहे का, कोणाला याप्रकरणाचा लाभ होणार आणि कोणाला हानी होणार, याबाबत विचारमंथन आणि चौकशी होऊन सत्य जनतेसमोर यावे.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसह महाराष्ट्रात गेल्या आठवडय़ापासून एफएम मिर्ची रेडिओ 93.5 आणि आर.जे. मलिष्का यांचे नाव खूपच गाजत आहे. विशेषत: सोशल मीडिया आणि महापालिकेत तर हा विषय खूपच गाजत आहे. त्यावरून महापालिकेत चांगलेच राजकारण झाले. महापालिका स्थायी समितीच्या बैठकीतही मलिष्काप्रकरण चांगलेच गाजले. त्याला कारणही तसेच होते.

एफएम मिर्ची रेडिओ जॉकी मलिष्का आणि तिच्या टीमने मुंबईच्या दीड कोटी जनतेला आणि मुंबईत रोज नोकरी, धंद्यासाठी येणाऱया चाळीस लाख लोकांना पिण्याच्या पाण्यापासून ते शौचालयापर्यंतच्या आवश्यक त्या सर्व नागरी सेवा सुविधा देणाऱया मुंबई महापालिकेच्या चारित्र्यावर ‘मुंबई तुला बीएमसीवर भरवसा नाही का ?’ हे गाणे प्रसारित करून टीकात्मक शिंतोडे उडवले. या गाण्यात मलिष्काने महापालिकेचे रस्ते, खड्डे यासह अन्य विषयाला हात घालत पालिकेच्या कारभारात झोल असल्याचा गंभीर आरोपही केला आहे. हे गाणे सोशल मीडियावर फिरू लागले. या गाण्यातील टीकेची सत्ताधारी पक्ष शिवसेनेने चांगलीच दखल घेतली. मग शिवसेनेतर्पे नगरसेविका किशोरी पेडणेकर आणि त्यांच्या टीमनेही मलिष्काला शिवसेना स्टाईलच्या गाण्यात उत्तर दिले. त्यामुळे या मलिष्काप्रकरणाला आणखीनच खतपाणी मिळाले. त्यानंतर, शिवसेनेचे नगरसेवक अमेय घोले आणि सदा सरवणकर यांनी आयुक्त अजोय मेहता यांना पत्र देऊन मलिष्काने पालिकेची नाहक बदनामी केल्याने तिच्यावर कायदेशीर कारवाई करून तिच्याविरोधात 500 कोटीचा नुकसानभरपाईचा दावा दाखल करण्याची मागणी केली होती. याच दरम्यान महापालिकेच्या किटकनाशक विभागाने बांद्रा येथील एका घरात डासांच्या अळ्या सापडल्याने नोटीस बजावली. नेमके ते घर मलिष्काची आई लिली मेंडोसा यांचे असल्याचे समोर आले. त्यामुळे मोठी खळबळ उडाली.

स्थायी समितीच्या बैठकीतही याप्रकरणाचे पडसाद उमटले होते. स्थायी समितीमध्ये समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनीच हरकतीच्या मुद्दय़ाद्वारे या प्रकरणाला हात घातला. त्याबरोबर भाजप गटनेते मनोज कोटक, कॉँग्ा्रsसचे विरोधी पक्षनेते रवि राजा यांनीही मग पालिका प्रशासनाला चांगलेच फैलावर घेत मलिष्काचे समर्थन केले. तर शिवसेनेलाही विरोधकांनी आणि भाजपने चिमटे काढले. त्यावर शिवसेनेचे सभागफह नेते यशवंत जाधव, आशिष चेंबूरकर, मंगेश सातमकर यांनी सेनेची आणि महापालिकेची बाजू लावून धरत या प्रकरणामागे काही राजकारण केले जात असून मालिष्काचा बोलाविता धनी वेगळाच असल्याचा आरोपही केला होता. हे प्रकरण एवढय़ावरच न थांबता पुन्हा महापालिकेवर शिंतोडे उडवणारे दुसरे एक गाणे एफएम रेडिओ 93.5 च्या टीमचे गाणे सोशल मीडियावर फिरू लागले. आता हे प्रकरण आणखीन किती वाढणार आणि कुठे जाऊन थांबणार, त्याचे आणखीन कोणावर किती आणि कसे परिणाम होणार, हे येणारा काळच सांगू शकेल. आता येथे हे प्रकरण एवढे का वाढले, त्यामागे काय कारण आहे का, याचाही शोध घ्यायला पाहिजे, असे सर्वसामान्य नागरिकांला वाटले तर त्यात काही गैर नाही.

तत्पूर्वी आपण मुंबई महापालिकेच्या विविध सेवासुविधांवरही एक कटाक्ष टाकल्यावर सारे लक्षात येते. महापालिकेतर्पे दररोज शहर व उपनगरातील दहा हजार मेट्रिक टन कचरा उचलण्यात येतो. तसेच, डेब्ा्रिज, ग्ा्राrन कचरा, ई-कचरा, जैविक कचराही उचलला जातो ते वेगळेच. पालिकेच्या तीन प्रमुख, 17 सर्वसाधारण रुग्णालये, प्रसूतिगफहे, आरोग्य पेंद्रे यांच्या माध्यमातून श्रीमंत, गरीब यांना आरोग्यसेवा दिल्या जातात. मुंबई शहर पोलिओमुक्त होण्यातही महापालिकेचा मोठा हातभार आहे. पालिकेच्या शिक्षण विभागामार्फत पालिकेच्या 1100 शाळेत विविध माध्यमांच्या साडेतीन लाख विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण आणि 27 प्रकारच्या शालेय वस्तू मोफत दिल्या जातात. मलनिस्सारण प्रक्रिया करणे आणि विल्हेवाट लावणे. राज्य सरकारची जबाबदारी असतानाही महापालिका 4 मेडिकल कॉलेज चालवत आहे. तसेच, मुंबईकरांना दररोज 200 कि मी. अंतरावरून म्हणजे मुंबई बाहेरील 5, मुंबईतील 2 अशा 7 तलावांतून 3750 दशलक्ष लीटर शुद्ध पाणीपुरवठा केला जातो. 550 उद्याने, नाटय़गफह, ओपन जिम  अशा अनेक सेवासुविधा मुंबईकरांना दिल्या जातात.

 ही देशातील एकमेव महापालिका आहे की, तिचा अर्थसंकल्प देशातील गोवा, झारखंड, केरळ आदी 13 लहान राज्यांच्या तुलनेत मोठा असून 61 हजार कोटी रु. विविध बँकेत फिक्स डिपॉझिट आहे. त्याचे साडेचार हजार कोटी वार्षिक व्याज येते. अशा महापालिकेचे रस्ते, खड्डे याबाबत काही चुकतही असेल. आणखीन कुठे तरी कमतरता असेल. हे महापालिका आणि सत्ताधारी शिवसेनेनेही मान्य करायला हवे. पण या गाण्यातून महापालिकेला जाणीवपूर्वक टार्गेट केले, ही वस्तुस्थिती आहे. एवढेच नव्हे तर पालिकेला टार्गेट करताना त्यांनी त्याभरात मुंबईतील रेल्वे आणि वाहतूक सेवेचे खापरही पालिकेच्याच माथी मारून आपले अज्ञानच प्रगट केले. कारण, वाहतूक आणि रेल्वे सेवा महापालिका पुरवत नाही.

तसेच जरा मलिष्काला रस्ते, खड्डे याबाबत काही तक्रार होती तर तिने प्रथम वॉर्ड कार्यालयात तक्रार दाखल करायला पाहिजे होती. हजारो मुंबईकर आपल्या तक्रारी पालिकेकडे दाखल करतात तर मलिष्का काय ‘स्पेशल चीज’ आहे का? तिने त्याबाबत कोणतीही तक्रार केली असती आणि जर त्यावर काही उपाययोजना झाली नसती तर मग तिने थेट आयुक्तांकडे तक्रार करायला हवी होती. त्यातूनही काही झाले नसते तर मग तिने कोर्टात जाऊन पालिकेला उघडे नव्हे नागडे केले असते तरी ठीक झाले असते. पण आपण अशी कोणतीही तक्रारच करायची नाही आणि एखाद्या गाण्याच्या माध्यमातून पालिकेच्या नावे शंख करायचा, त्याचा सोशल मीडियाच्या माध्यमांतून गाजावाजा करायचा, हा कसला थिल्लरपणा आहे? अशाने समस्या सुटतात का? जर असे व्हायला लागले तर उद्या मुंबईत राहणारे सगळेच कलावंत, कलाकारांनी मलिष्काचे अनुकरण करायचे का? बरं, मुंबईमध्ये एकटय़ा मुंबई महापालिकेचेच रस्ते नाहीत, म्हाडा, एमएमआरडीए, एअरपोर्ट, बीपीटी, सार्वजनिक बांधकाम खाते आदींच्या अखत्यारीत रस्तेही आहेत. त्या रस्त्यांवरील खड्डय़ांबाबत या मलिष्काबाईंना ते दिसत नाहीत का, की त्या रस्त्यांबाबत ‘तेरी भी चुप और मेरी भी चुप’ असे आहे का?

दुसरे असे की, रेल्वेची काही समस्या असेल वा त्याबाबत काही आक्षेप असेल तर त्या रेल्वेबाबतही एखादे गाणे कशाला एक फक्कडशी लावणीच सादर होऊन जाऊ देत ना, असे जर सर्वसामान्य नागरिकांनी म्हटले तर त्यात वावगे काय?     तसेच मलिष्काने हे गाणे एका तासात तयार केलेले नाही. त्यामागे काही तास, दिवसांची मेहनत असणारच. या बाईंच्या मागे कोणीतरी राजकीय हस्ती असणार, कोणी तरी पहारेकरी असणार, अशी शंका जर शिवसेनेने व्यक्त केली तर त्यांचे काय चुकते. अन्यथा या बाई एवढय़ा जोरात पालिकेबाबत ओरड कशी काय करू शकतात? त्यामुळे या एकूण प्रकरणात पालिकेनेही आपले कुठे चुकते त्याबाबत आत्मपरीक्षण करावे. मलिष्काने हे असे गाणे सादर का केले, त्यामागे कोणी आहे का, याप्रकरणात कोणी उगाचच राजकारण करीत आहे का, कोणाला याप्रकरणाचा लाभ होणार आणि कोणाला हानी होणार, याबाबत विचारमंथन आणि चौकशी होऊन दूध का दूध, आणि पानी का पानी समोर यायला हवे, एवढे खरे!

Related posts: