|Thursday, February 27, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » ययाति शर्मिष्ठाभेट

ययाति शर्मिष्ठाभेट 

देवयानी ययाति सोबत परम रमणीय, मनोरम अशोकवाटिकेत येत असे. तिथे शर्मिष्ठासह वन विहार करत असे. मग शर्मिष्ठाला तेथेच सोडून राजा सोबत राजमहालात परत जात असे. प्रसन्न चित्ताने असा आनंद ती बराच काळ भोगत राहिली. आनंदाच्या राशीवर बसलेल्या आणि सर्व सुखांचा स्वामी बनलेल्या नहुषपुत्र ययातिने देवयानीच्या सहवासात अनेक वर्षे मोठय़ा सुखात घालवली. त्याने प्रत्यक्ष देवांनाच शोभेल असा तिच्या सहवासात विहार केला. थोडय़ा दिवसांनी लावण्यवती देवयानीला ऋतुकाल प्राप्त झाला आणि तिला गर्भ राहिला. आणि योग्य काळानंतर तिला पुत्र झाला.

बऱयाच काळानंतर वृषपर्वकन्या शर्मिष्ठालाही ऋतुकाल प्राप्त झाला. तिने स्वतःला रजस्वला अवस्थेत पाहिल्यावर ती चिंतामग्न झाली. स्नान करून शुद्ध होऊन सर्व आभूषणांनी विभूषित झालेली शर्मि÷ा सुंदर पुष्पांच्या गुच्छांनी बहरलेल्या अशोक वृक्षाला टेकून उभी होती. आरशात आपले सुंदर मुख पाहून तिच्या मनात आपल्या पतीच्या दर्शनाची तीव्र इच्छा निर्माण झाली. त्यामुळे शोक आणि मोहाने युक्त होऊन ती आपल्या मनाशीच संवाद करू लागली – हे अशोक वृक्षा! ज्यांचे हृदय शोकात बुडून गेले आहे, त्यांच्या मनातील शोक तू दूर करणारा आहेस. यावेळी मला माझ्या प्रियतमाचे दर्शन घडवून तुझ्या नावाची (अशोक) बनव. असे म्हणून शर्मिष्ठापुढे म्हणाली – मला ऋतुकाल प्राप्त झाला, पण अजूनी मला माझा वर प्राप्त झाला नाही. पती म्हणून मी अजून कुणाला वरले नाही. ही कशी विचित्र परिस्थिती आली. आता मला काय करायला हवे? काय केल्याने मला पुण्य प्राप्त होईल? देवयानी तर पुत्रवती झाली; परंतु मला जे यौवन प्राप्त झाले, ते वाया जात आहे. ज्याप्रमाणे तिने महाराजा ययातिना पती म्हणून वरले आहे, त्याचप्रमाणे मी देखील त्याच महाराज ययातिना पती म्हणून का वरू नये? मी याचना केल्यावर महाराज मला पुत्ररूपी फल देऊ शकतात याची मला खात्री आहे. पण धर्मात्मा ययाति महाराज मला एकान्तात दर्शन कसे देतील?

बोलाफुलाला गाठ पडली. शर्मिष्ठाच्या मनात विचारांचे असे काहूर माजले असता इकडे असें झाले की, राजा ययाति आपल्या राजवाडय़ातून बाहेर पडला, आणि योगायोगाने नगराच्या बाहेर असलेल्या अशोकवाटीकेजवळ गेला. तेथे त्याला शर्मि÷ा उभी असलेली दिसली. तिला पाहताच तो थांबला. नुकतीच यौवनात पदार्पण केलेली राजकन्या शर्मि÷ा अतिशय सुंदर दिसत होती. तिचे अंग सौ÷व ऐन बहरात आले होते. वसंतात बहरलेली सृष्टी आणि नव यौवनात आलेली ललना यांना पाहून राजाच्या मनातील काम भावना जागृत होत होती. त्याचवेळी आजूबाजूला दुसरे कोणीही नाही, आणि एकटा ययातिच तेथे आहे, असा योग जुळून आल्याने चारुहासिनी शर्मि÷ा त्याचे स्वागत करण्याच्या इराद्याने त्याला सामोरी गेली, आणि हात जोडून त्याच्याशी धीर करून बोलू लागली.

– ऍड. देवदत्त परुळेकर

Related posts: