|Saturday, February 22, 2020
You are here: Home » leadingnews » उदयनराजे सातारा पोलिस स्टेशनमध्ये दाखल

उदयनराजे सातारा पोलिस स्टेशनमध्ये दाखल 

ऑनलाईन टीम / सातारा :

साताऱयातील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे यांनी आज सातारा शहर पोलिस स्टेशनला हजेरी लावली. खंडणीचा आरोप असलेल्या उदयनराजेंचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच फेटाळला होता.

त्यामुळे उदयनराजे पोलिस ठाण्यात हजर राहणार की नाही याबाबत चर्चा रंगली होती. अखेर आज सकाळी उदयनराजे कार्यकर्त्यांसह सातारा पोलिस स्टेशनमध्ये हजेरी लावली. अगदी पाचच मिनिटे पोलिस स्टेशनमध्ये थांबून उदयनराजे बाहेर पडले. त्यानंतर पुन्हा ते पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाले. दरम्यान वैद्यकीय तपासणीसाठी उदयनराजेंना रूग्णालयता नेण्यात आले आहे.

 

Related posts: