|Tuesday, January 21, 2020
You are here: Home » leadingnews » रामनाथ कोविंद यांनी घेतली राष्ट्रपतीपदाची शपथ

रामनाथ कोविंद यांनी घेतली राष्ट्रपतीपदाची शपथ 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

देशाचे चौदावे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद यांनी शपथ घेतली आहे. देशाचे मुख्य न्यायाधीश जे एस खेहर नवनिर्वाचित राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज दुपारी 12 वाजून 15 मिनिटांनी पद आणि गोपानियतेची शपथ दिली.

राष्ट्रपतींच्या शपथविधी सोहळय़ाला उपराष्ट्रपती पंतप्रधान नरेंद्र मोदी, संसदेच्या दोन्ही सभागृहाचे खासदारांनी उपस्थिती लावले. संसद भवानाच्या सेंट्रल हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमानंतर माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींना सैन्याच्या तिन्ही दलातर्फे गार्ड ऑफ ऑनर देऊन निरोप देण्यात आला आहे. राष्ट्रपती भवनमध्ये जाण्याआधी रामनाथ कोविंद यांनी आज सकाळी राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली.

 

 

Related posts: