|Thursday, February 27, 2020
You are here: Home » leadingnews » पाच दिवसांचा आठवडा नाहीच ; राज्य सरकारचे स्पष्टीकरण

पाच दिवसांचा आठवडा नाहीच ; राज्य सरकारचे स्पष्टीकरण 

ऑनलाईन टीम / मुंबई :

राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा करण्याबाबत सरकारने कोणतीही समिती स्थापन केलेली नाही, त्यामुळे पाच दिवसांच्या आठवडय़ाबाबत प्रश्नच उद्भवत नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधिमंडळात दिले.

आमदार कपिल पाटील आणि अनंत गाडगीळ यांनी पाच दिवसांच्या आठवडय़ाबाबत लेखी प्रश्न विचारला. राज्य सरकारी कर्मचारी संघटना, राजपत्रित अधिकारी संघटना आणि शिक्षक भारती मागणीनुसार कामकाजाचा आठवडा पाच दिवसांचा करण्याबाबत शासनाने नेमलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाल्याबाबत विचारले. या प्रश्नावर लेखी उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, पाच दिवसांच्या आठवडय़ाबाबत सरकारकडून कोणतीही समिती स्थापन केलेली नाही. त्यामुळे अहवालानुसार सरकारचा निर्णय काय हा प्रश्न उद्भवत नाही.

Related posts: