|Monday, January 27, 2020
You are here: Home » leadingnews » नितीशकुमार यांचा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

नितीशकुमार यांचा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा 

ऑनलाईन टीम / पटना :

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा आज राजीनामा दिला. राज्यपालांची भेट घेऊन त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास नकार दिल्याने नितीशकुमार यांनी पदाचा राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे.

राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि माजी रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव आणि त्यांचे पूत्र आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. या आरोपावरुन तेजस्वी यादव यांना उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा मागण्यात येणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, तेजस्वी यादव आपल्या पदाचा राजीनामा देणार नसल्याचे लालूप्रसाद यांच्याकडून सांगण्यात आले होते. त्यामुळे या सर्व राजकीय घडामोडींनंतर नितीशकुमार यांनी आज राज्यपालांची भेट घेऊन पदाचा राजीनामा सुपूर्द केला.

 

Related posts: