|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » शेवटची मारामारी

शेवटची मारामारी 

हरिदास आता साठीला पोचलाय. तो आज जसा खवय्या कम तुंदिलतनू आहे तसाच पंचेचाळीस वर्षांपूर्वी देखील होता. शाळेत असताना आम्ही त्याला चेंडू म्हणायचो. चिडला तरी आम्हाला मारण्यासाठी तो आमचा पाठलाग करू शकत नसे. हे समजल्यावर त्याने पाठलाग करणं आणि नंतर चिडणं सोडून दिलं. तो चिडत नाही म्हटल्यावर कंटाळून आम्ही त्याला चिडवणं सोडून दिलं. अशा रीतीने हरिदास बालपणीच संयमाची मूर्ती बनला. कधी कधी चिडायचा. पण आपलं वजन, बीपी वगैरेचा विचार करून स्वतःला शांत करायचा. 

कॉलेजमध्ये त्याचा प्रेमभंग झाला. नोकरी लागल्यावर ते दु:ख विसरेपर्यंत काही वर्षे गेली. मग त्याने मुली बघायला सुरुवात केली. आता तो ज्ये÷ झाला होता. पुढच्या वषी प्रमोशनची संधी होती. आणि त्याच्या पुढच्या वषीपासून हरिदासच्या पत्रिकेत साडेसाती होती. त्यामुळे त्याला आता लग्नाची आणि प्रमोशनची घाई झाली.

प्रमोशन मिळालं की लांब बदली होते. अशा वेळी घरात बाळ असेल तर साहेबांचं ह्रदय द्रवून जवळपास प्रमोशन मिळू शकतं. 

त्याने एक मुलगी पसंत केली. पण तिच्या घरच्यांकडून होकार किंवा नकार काहीच येईना. सहा महिन्यांच्या आत लग्न झालं पाहिजे. लवकरात लवकर अपत्यसंभव व्हायला पाहिजे. म्हणजे प्रमोशनच्या इंटरव्हय़ूच्या वेळी हात जोडून सांगता येईल की घरात छोटं बाळ आहे. घरापासून जवळ प्रमोशन द्या.

हरिदास एका ज्योतिषाकडे गेला. त्याने सांगितलं की किमान सहा महिने लग्नाचा योग नाही. सहा महिन्यांनी हंगामातले लग्नाचे मुहूर्त संपणार होते.

सेकंड ओपिनियन घेण्यासाठी हरिदास दुसऱया ज्योतिषाकडे गेला. त्याने कुंडली बघितल्यासारखं केलं आणि (ज्योतिषी लोकांच्या सवयीनुसार) म्हणाला, एवढे सहा महिने जाऊ द्या. 

लास्ट ट्राय म्हणून हरिदास तिसऱया ज्योतिषाकडे गेला आणि पत्रिका न दाखवता आपली समस्या सांगितली. ज्योतिषी म्हणाला, नंतरच लग्न करा. तेव्हा हरिदासने त्याचा निषेध किंवा कडी निंदा न करता थेट गचांडी धरून एक ठेवून दिली. ज्योतिषानेही चार ठेवून दिल्या आणि वर शाप दिला की या हंगामात तुझं लग्न होणार नाही आणि पुढच्या वषी तुला प्रमोशन मिळणार नाही. तीच त्याची शेवटची मारामारी.

हरिदासने ज्योतिषाची क्षमा मागितली. ज्योतिषाने एक महागडी ग्रहशांती केली आणि हरिदास चतुर्भुज झाला. त्याला प्रमोशनदेखील मिळालं.

Related posts: