|Thursday, February 27, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » कलामांकडून तरुणाईला मिळाली प्रेरणा : मोदी

कलामांकडून तरुणाईला मिळाली प्रेरणा : मोदी 

रामेश्वरम / वृत्तसंस्था :

तामिळनाडूच्या रामेश्वरम येथील पिकारंबू या गावात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिवंगत माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्मारकाचे अनावरण गुरुवारी झाले. अनावरणानंतर झालेल्या सभेत बोलताना मोदींनी कलामांमुळे देशातील तरुणाईला प्रेरणा मिळाल्याचे उद्गार काढले. रामेश्वरमच्या या पवित्र भूमीला स्पर्श करून सन्मानाची अनुभूती होतेय. रामेश्वरम हे अध्यात्मिक ज्ञानाचे केंद्र मानले जाते. भारताला एपीजे अब्दुल कलाम यांच्यासारखा महान पुत्र देणारी हीच ती पवित्र भूमी असल्याचे वक्तव्य त्यांनी केले.

कलामांचे स्मारक उभारण्यासाठी प्रतिबद्धतेसह कमा करणाऱया मजुरांना उभे राहून सलाम केला जावा. त्यांनी ठरलेली वेळ संपल्यावर दोन तास अधिक श्रम कोणत्याही अतिरिक्त वेतन न मागता स्मारकाच्या उभारणीसाठी केले. डॉ. कलामांनी देशाच्या तरुणाईला प्रेरित केले, त्यांच्या पेरणेमुळेच तरुणाई रोजगार निर्माती झाल्याचे उद्गार मोदींनी काढले.  डीआरडीओने निर्मिलेल्या या स्मारकाची पाहणी मोदींनी केली. कलाम हे दीर्घकाळापर्यंत डीआरडीओच्या अनेक पदांवर कार्यरत राहिले होते. या स्मारकात अशी क्षेपणास्त्रs आणि अग्निबाणांच्या प्रतिकृती ठेवण्यात आल्या आहेत, ज्यावर कलामांनी काम केले होते.

या कार्यक्रमावेळी अम्मांची (तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता) कमतरता मला जाणवत आहे. त्यांचा आत्मा आम्हाला आशिर्वाद देत राहिल असा मला विश्वास आहे. जर अम्मा आज आमच्यात असत्या, तर अत्यंत आनंदी दिसल्या असत्या असे मोदी म्हणाले.

सभेत मोदींनी मच्छिमारांसाठी सरकारने उचलेल्या कल्याणकारी योजनांचा उल्लेख केला. तसेच पंतप्रधानांनी ‘कलाम संदेश वाहिनी’ नावाच्या प्रदर्शनीय बसला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. ही बस देशाच्या विविध राज्यांमध्ये प्रवास करून 15 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपती भवन येथे दाखल होईल, त्याच दिवशी माजी राष्ट्रपतींची जयंती आहे. गुरुवारी रामेश्वरमहून अयोध्येसाठी एक्स्प्रेस रेल्वेला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. मोदी सरकारने उत्तर आणि दक्षिणेच्या हिंदूंना जोडण्यासाठी रामेश्वरम ते अयोध्येपर्यंत थेट रेल्वेची भेट दिली आहे.

Related posts: