|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री धरमसिंग यांची ‘एक्झीट’

कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री धरमसिंग यांची ‘एक्झीट’ 

प्रतिनिधी /बेंगळूर :

ज्ये÷ राजकारणी, काँगेस नेते आणि माजी मुख्यमंत्री एन. धरमसिंग (वय 80) यांचे गुरुवारी सकाळी हृदयविकाराच्या धक्क्मयाने निधन झाले. हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांना बेंगळुरातील एम. एस. रामय्या इस्पितळात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचाराचा उपयोग न झाल्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. गुलबर्गा जिल्हय़ातील नागनहळ्ळी (ता. जेवर्गी) येथे शुक्रवार दि. 28 जुलै रोजी सायं. 4 वा. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनामुळे राजकीय क्षेत्रातील नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.

गेल्या पाच दशकांचा गाढा राजकीय अनुभव त्यांना होता. हैद्राबाद-कर्नाटक भागातील एक प्रभावी नेते राजकारणी म्हणून ते ओळखले जात होते. 2004 ते 2006 या कालावधीत मुख्यमंत्रिपद भूषविलेले धरमसिंग एक अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून कर्नाटकासह देशभरात परिचित होते. 1978 ते 2008 या कालावधीत सलग 7 वेळा ते विधानसभेवर निवडून आले होते. काँगेस आणि निजद पक्षाचे संमिश्र सरकार असताना कर्नाटकाचे सतरावे मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली होती. 2009 मध्ये लोकसभा निवडणुकीत त्यांनी विजय संपादन केला होता. मात्र 2013 मधील लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभूत व्हावे लागले होते.

जेवर्गी तालुक्मयातील नेलोगी येथे 25 डिसेंबर 1936 मध्ये एन. धरमसिंग यांचा जन्म झाला. त्यांनी हैद्राबादमधील उस्मानिया विद्यापीठातून एम.ए., एल.एल.बी. पदवी मिळविली होती. काही काळ वकिली सेवाही बजावली. त्यांच्या पश्चात्त पत्नी प्रभावती, मुलगे डॉ. अजय सिंग, विजयसिंग, मुलगी प्रियदर्शीनी असा परिवार आहे.

Related posts: