|Monday, January 27, 2020
You are here: Home » leadingnews » नितीश कुमारांसमोर बहुमत सिद्ध करण्याचे आव्हान

नितीश कुमारांसमोर बहुमत सिद्ध करण्याचे आव्हान 

ऑनलाईन टीम / पाटणा :

बिहारमधील नाटय़मय घडामोडीनंतर नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. मुंख्यमंत्री नितीशश कुमार यांनी आधीच 132 आमदारांच्या समर्थनांचे पत्र राज्यपालांना दिले आहे. मात्र विधानसभेत नेमके काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दुसरीकडे राजदचे आमदार नेमकी भूमिका काय असणार याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.दरम्यान, काल नितीश कुमार यांनी सहाव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली.तर भाजपचे सुशील मोदी बिहारचे नवे उपमुख्यमंत्री झाले आहेत. जदयू आणि भाजपचे प्रत्येकी 14-14 मंत्री मत्रिमंडळात असतील अशी माहिती मिळते आहे.

नितीश कुमार यांना काल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. बिहारमध्ये झालेल्या नाटय़मय घडामोडीनंतल भाजपने नितीश कुमारांना पाठिंबा जाहीर केला, त्यामुळे भाजपची बिहारच्या सत्तेत पुन्हा एन्ट्री झाली आहे.

 

Related posts: