|Saturday, February 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » देवकर पाणंदमधील वृध्देचा स्वाईन फ्लूने मृत्यू

देवकर पाणंदमधील वृध्देचा स्वाईन फ्लूने मृत्यू 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

स्वाईन फ्लूने देवकर पाणंदमधील एका वृध्द महिलेचा बळी घेतला. पार्वती कृष्णात खामकर (वय 67, रा. प्लॉट नं. 5 पद्मावती कॉलनी, देवकर पाणंद, कोल्हापूर) असे या वृध्द महिलेचे नाव आहे. त्यांचा सीपीआरमध्ये उपचार सुरू असताना शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला. स्वाईन फ्लूच्या रूग्ण संख्येत दिवसेंदिवस लक्षणिय वाढ होत असून स्वाईनच्या बळींची संख्या 17 वर पोहचली आहे. 

शनिवारी सायंकाळी पार्वती खामकर यांचा सीपीआरमध्ये स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला. सोमवारी त्यांना धापेचा त्रास सुरू झाला आणि त्यातच त्यांना तापही आला.  यामुळे त्यांना खासगी रूग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. तपासणीमध्ये त्यांना स्वाईन सदृश्य लक्षणे आढळून आली. त्यानुसार त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. परंतू त्यांची प्रकृती खालावल्याने गंभीर अवस्थेत सीपीआरमध्ये पुढील उपचारसाठी दाखल करण्यात आले. शनिवारी सायंकाळी  सहा वाजता उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. शहरातील वृध्देचा मृत्यू शनिवारी झाल्याने आरोग्य प्रशासन यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. नागरिकांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य खबरदारी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. 

दरम्यान, बदलत्या वातारवणामुळे जिल्हयातील स्वाईन फ्लूचा दिवसेंदिवस फैलाव वाढत चालला आहे. शनिवारी जिल्हयात स्वाईन फ्लू पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 75 वर पोहचली असून स्वाईन फ्लू सदृश्य 168 रूग्ण आढळले आहेत. या सर्व रूग्णांवर विविध खासगी, शासकीय रूग्णालयांमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.  

शहरामध्येही स्वाईन फ्लू च्या रूग्णांमध्ये वाढ झाली असून सीपीआरमध्ये 6 स्वाईन फ्लू पॉझिटिव्ह रूग्णांवर, शहरातील विविध खासगी रूग्णालयात स्वाईन फ्लू पॉझिटिव्ह 12 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच जिल्हयात स्वाईन फ्लू सदृश्य 168 रूग्ण आढळले असून स्वाईन फ्लू पॉ†िझटिव्ह रूग्ण 75 आहेत. त्यांच्यावर  खासगी व शासकीय रूग्णालयांमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.   सीपीआरसह शहरातील विविध खासगी रूग्णालयात स्वाईन फ्लू सदृश्य रूग्णांची संख्येत लक्षणिय वाढ झाली आहे. अशी माहिती सीपीआरमधून देण्यात आली आहे.     

 

 

Related posts: