|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » leadingnews » जम्मू काश्मीरात दोन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीरात दोन दहशतवाद्यांचा खात्मा 

ऑनलाईन टीम / जम्मू :

जम्मू काश्मीरातील पुलवामा येथे भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. हे दहशतवादी कुख्यात दहशतवादी संघटना हिज्बुल मुजाहिद्दीन या संघटनेचे असल्याची माहिती मिळत आहे.

पुलवामामधील तहाब परिसरात हे दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलातील जवानांना मिळाली होती. त्यानंतर स्थानिक पोलीस आणि लष्कराने आसपासच्या परिसरात शोधमोहीम राबवली होती. यादरम्यान लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी पथकावर गोळीबार सुरु केला. त्यानंतर पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांनी केलेल्या प्रत्युत्तरात दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.

Related posts: