|Saturday, December 7, 2019
You are here: Home » मनोरंजन » नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य बनले मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक

नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य बनले मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक 

ठेका धरायला लावणाऱया गाण्यावर उत्तम कोरिओग्राफी करून त्याच गाण्यात स्वत: दिसण्यासाठी कोरिओग्राफर गणेश आचार्य प्रसिद्ध आहेत. हिंदी मराठीतील गाजलेल्या अनेक गाण्यांची कोरिओग्राफी केल्यानंतर गणेश आचार्य आता चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. ‘स्वामी तिन्ही जगाचा भिकारी’ असे चित्रपटाचे नाव असून चित्रपटात स्वप्निल जोशी आणि ऋचा इनामदार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. येत्या 4 ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

 गणेश आचार्य हे नाव चित्रपटप्रेमींच्या चांगले परिचयाचे आहे. त्यांची कोरिओग्राफी असलेली ‘चिकनी चमेली’सारखी अनेक गाणी प्रचंड गाजली आहेत.  त्याशिवाय स्वामी (2007), मनी है तो हनी है (2008) आणि एंजल (2011) या हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शनही त्यांनी केलं आहे. अलीकडे मराठी चित्रपट्तील गाजलेल्या आला होळीचा सण लय भारी, तुझी चिमणी उडाली भूर्रर्र, डॅशिंग गोविंदा अशा गाण्यांची कोरिओग्राफी केली आहे. मराठी चित्रपटांची कोरिओग्राफी करतानाच आता ते मराठीत दिग्दर्शकीय इनिंगही सुरू करत आहेत. अनेक वर्षापासून मित्र असलेले गणेश आचार्य आणि शरद शेलार यांनी मी मराठा फिल्म प्रोडक्शनची स्थापना करून चित्रपट निर्मितीमध्ये प्रथम पाऊल टाकले आहे.

स्वामी तिन्ही जगाचा भिकारी हा चित्रपट मोठय़ा बिजनेस कुटुंबातील आई आणि मुलाच्या हळव्या नात्यावर बेतला आहे. स्टार अभिनेता स्वप्नील जोशी, रुचा इनामदार, गुरू ठाकूर, सयाजी शिंदे, मिलिंद शिंदे, कीर्ती आडारकर, सुनील पाल  आणि प्रदीप काब्रा अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात पहायला मिळणार आहे. गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटाने स्वत:चा ठसा उमटवला आहे. उत्तम आशय आणि व्यावसायिक यश या दोन्हीचा मिलाफ मराठी चित्रपटांत होत आहे. मराठीत काम करताना सकस आशय ही मराठी चित्रपटांची ताकद असल्याचे लक्षात आले. त्यामुळे मला स्वत:ला बरीच वर्ष मराठी चित्रपट दिग्दर्शित करायचा होता. ती इच्छा या चित्रपटाच्या निमित्ताने पूर्ण होत आहे. वेगळं कथानक आणि उत्तम स्टारकास्ट हे चित्रपटाचं वैशिष्टय़ आहे. हा चित्रपट मराठी चित्रपटरसिकांना नक्कीच आवडेल, असे गणेश आचार्य यांनी सांगितले.

या सिनेमातील काशा हे गाणे अवधूत गुप्ते, आनंद शिंदे यांनी गायले असून गणेश आचार्य यांचा आवाजदेखील आपल्याला या गाण्यात ऐकता येणार आहे. भिकारी लोकांचे आयुष्य आणि त्यांची दिनचर्या मांडणाऱया या गाण्याचे सुबोध पवार आणि गणेश आचार्य यांनी लिहिले आहेत. शिवाय बाळा हे गाणेदेखील चांगले जमले असून, लंडनच्या रस्त्यावर  मराठीचा सुपरस्टार स्वप्नील जोशी, चक्क हिपहॉप करताना आपल्याला यात पाहायला मिळतो. हिंदीचे प्रचलित संगीत दिग्दर्शक विशाल मिश्रा यांचा आवाज आणि ताल या गाण्याला लाभला आहे.   त्याचप्रमाणे देवा हो देवा, मागू कसा आणि ये आता ही गाणीदेखील या चित्रपटात आहेत.

 

Related posts: