|Sunday, September 22, 2019
You are here: Home » मनोरंजन » उंडगा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

उंडगा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला 

रेडस्मिथ प्रॉडक्शन्स प्रस्तुत आणि सायरा सय्यद व सिकंदर सय्यद निर्मित ‘उंडगा’ हा चित्रपट 4 ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात एक उंडगा मित्र असतो. अशा प्रत्येक माणसाच्या आयुष्यातल्या उंडगा मित्र आठवावा अशी एक गोष्ट दिग्दर्शक विक्रांत वार्डे आपल्यासाठी घेऊन आले आहेत. मैल, ताऱयांचे बेट, टुरिंग टॉकिग फेम चिन्मय संत, लागिरं झालं जी फेम शिवाजी बावकर, स्वप्नील कणसे, अरुण नलावडे, शर्वरी गायकवाड, मयुर बच्छाव हे कलाकार चित्रपटात आहेत. पटकथा आणि संवाद सुदर्शन रणदिवे यांचे आहेत. कार्यकारी निर्माता श्रोणवी खामकर आहेत. संगीतही विक्रांत वार्डे यांचे असून स्वप्नील बांदोडकर, बेला शेंडे, आदर्श शिंदे, नंदेश उमप, जसराज जोशी यांनी चित्रपटातील गाणी गायली आहेत. 4 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील 110 सिनेमागफहात हा उंडगा प्रदर्शित होतोय.