|Thursday, January 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » पीकविम्यासाठी रविवारीही बँक हाऊसफुल्ल!

पीकविम्यासाठी रविवारीही बँक हाऊसफुल्ल! 

प्रतिनिधी/ सांगली

पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी जिल्हय़ातील विशेषतः दुष्काळी तालुक्यातील शेतकऱयांनी एकच गर्दी केली होती. रविवारी जवळपास आठ हजारहून अधिक शेतकऱयांनी हा पीक विमा भरला आहे. जिल्हा बँकेच्या 217 शाखांतून हा पीक विमा भरून घेतला जात होता. आजअखेर जवळपास 34 हजार शेतकरी या योजनेत सहभागी झाले असून सोमवारी  पीकविमा भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्युमळे आणखीन दहा ते पंधरा हजार शेतकरी यामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान पीक विमा योजनेत अर्ज हे ऑनलाईन भरण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत. पण, या पीक विम्याचे पोर्टल नेहमी हँग होत असल्याने जिल्हा बँकेने मात्र हा पीकविमा ऑनलाईन न भरून घेता तो ऑफलाईन भरून घेण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे शेतकऱयांना त्याचा चांगलाच लाभ झाला. शनिवारी हा पीक विमा भरण्यासाठी मोठय़ाप्रमाणात शेतकऱयांची झुंबड उडाली होती. त्यामुळे जिल्हा बँकेने रविवारीही आपल्या शाखा सुरू करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार जिल्हय़ातील सर्व शाखा रविवारी सुरू ठेवण्यात आल्या होत्या. आणि त्या उशिरापर्यंत सुरू ठेवल्या गेल्या होत्या.

तासगाव, कवठेमहांकाळ, जत तालुक्यात गर्दी

जिल्हय़ात दुष्काळ आणि टंचाईसदृष्य परिस्थिती असणाऱया गावातील शेतकऱयांनी या पंतप्रधान पीक विमा योजनेत मोठयाप्रमाणात सहभाग घेतला त्यामध्ये उमदी, सोन्याळ, बेळुंडगी, संख, पेड, हातनूर, मांजर्डे या शाखांतून दिवसभर गर्दी होती. या शाखात मोठय़ाप्रमाणात गर्दी होणार म्हणून जिल्हा बँकेकडून याठिकाणी मुख्यालयातील कर्मचारी या शाखेत मदतीसाठी पाठविण्यात आले होते. त्यामुळे रविवार असूनही आठ हजारापेक्षा अधिक शेतकऱयांनी पीक विमा योजनेत सहभाग घेतला. रविवारी संध्याकाळी उशिरापर्यंत हे पीकविमा घेण्याचे काम सुरू होते.

आज शेवटचा दिवस

पंतप्रधान पीक विमा भरण्याचा शेवटचा दिवस 31 जुलै हा आहे. या मुदतीच्या आतमध्येच ज्या शेतकऱयांनी पीक विमा भरला आहे त्या शेतकऱयांनाच भविष्यकाळात या पीकविम्याचा लाभ मिळणार आहे. गेल्यावर्षी हा पीकविमा न काढल्याने अनेक शेतकऱयांना नुकसान सहन करावे लागले होते. त्यामुळे यावर्षी शेतकऱयांच्यामध्ये पीकविमा बाबत मोठयाप्रमाणात जनजागृती झाली आहे. सोमवारी हा पीकविमा भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने यादिवशी जवळपास 15 हजार हून अधिक शेतकरी या योजनेत सहभागी होतील असा अंदाज आहे.

अधिकाऱयांकडून तपासणी

जिल्हय़ात पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतकऱयांना कोणतीही अडचण होऊ नये तसेच हा पीकविमा भरण्यासाठी त्यांना ताटकळत राहावे लागू नये यामुळे जिल्हा बँकेने ज्या शाखेत मोठय़ाप्रमाणात गर्दी होणार आहे त्याठिकाणी मुख्यालयातील कर्मचारी पाठवून शेतकऱयांची सोय पेली होती. दरम्यान, रविवारी हे काम कसे सुरू आहे याची माहिती घेण्यासाठी बँकेचे प्रभारी सीईओ बी.एस. रामदुर्ग आणि व्यवस्थापक मानसिंगराव पाटील यांनी अनेक शाखांना भेटी देऊन या कामकाजाची पाहणी केली. तसेच शेतकऱयांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या तसेच त्यांच्या शंकाकुशंकाही त्यांनी दूर केल्या.

Related posts: