|Saturday, January 25, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » उजनीने गाठली पन्नाशी

उजनीने गाठली पन्नाशी 

पंढरपूर / प्रतिनिधी

सोलापूर जिह्याची वरदायिनी उजनी धरणाची पाणी पातळी सोमवारी संध्याकाळी सहा वाजता जरी 49.55 टक्के इतकी असली तरी रात्री उशीराने उजनीने पन्नाशीचा आकडा गाठला आहे. त्यामुळे साहजिकच शेतकऱयांसह जिल्हावासियांना मोठा दिलासा मिळालेला दिसून आलेला आहे.

याबाबत अधिक माहिती, सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास 47.96 टक्के इतकी असली. तरी दिवसभर दौंड येथून आलेल्या मोठय़ा विसर्गाने उजनीच्या पाणी पातळीमध्ये दिवसभरामध्ये दोन टक्याची वाढ झालेली आहे. त्यामुळेच रात्री उशीराने उजनीने पन्नाशी गाठली.

गतवर्षी 1 ऑगस्ट रोजी वजा अंशामध्ये असलेले उजनी धरण यावर्षी मात्र प्लस पन्नास टक्के झालेले आहे. त्यामुळे निश्चितच गतवर्षीपेक्षा यंदा जिह्याला चांगला दिलासा मिळालेला दिसून आलेला आहे.

उजनी धरण वास्तविक पुणे जिह्यातील भीमा नदींच्या खोऱयातील पावसावर भरलेले असते. गेल्या पंधरा दिवसापूर्वी मोठया क्षमतेने पुणे येथे पाऊस झालेला होता. त्यानंतर उजनीची पातळी हळूहळू वधारत होती. त्यानंतर धरण वजा अंशामधून प्लसमध्ये आले. अवघ्या पंधरा दिवसामध्ये अधिक पन्नास टक्यांवर येऊन पोहोचलेले आहे.

गतवर्षी 6 ऑगस्ट रोजी उजनी शून्यावर आलेले होते. त्यानंतर पुढील 56 दिवसामध्ये म्हणजेच 2 ऑक्टोबर रोजी उजनीने शंभरी गाठलेली होती. मात्र, त्या तुलनेत यंदा अवघ्या पंधरा दिवसातच उजनीने पन्नाशी गाठलेली आहे. अशामधेच गेलया आठवडय़ा भरापासून पुणे येथील मंदावलेल्या पावसाने परत एकदा सोमवारपासून पुनरागमन केलेले आहे. अशामध्येच पुणे येथील भीमा नदींवर असणारी 11 धरणाची वाटचाल शंभरीकडे होत आहे. यामध्ये जर आणखी पाणीसाठा झाला. तर हीच धरणे ओव्हरफ्ले होऊन याचे पाणी उजनीमध्ये येऊ शकते. त्यामुळे निश्चितच दौंड येथील उजनीमध्ये येणारा विसर्ग वाढला. तर ऑगस्ट महिना अखेरच उजनी धरण शंभरी पार करेल. अशी आशा सध्या निर्माण होताना दिसत आहे.

सध्या उजनीमधून कालव्याला 3 हजार क्युसेक आणि बोगद्यालाही पाणी सोडले जात आहे. याशिवाय दौंड येथील 14 हजार 327 क्युसेकचा विसर्ग हा उजनीमधे प्रवाहीत होत आहे. त्यामुळे निश्चितच उजनीच्या पाणीपातळीमध्ये वाढ होत आहे. याशिवाय वीर धरणामधून चार हजार 458 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे. वीरचे पाणी नीरा नरसिंहपूर येथे येऊन तेथून संगामाव्दारे ते भीमेत येणार आहे. साधारणपणे बुधवारी रात्री उशीरापर्यत वीरचे पाणी संगामाव्दारे पंढरपूरपर्यत येण्याची शक्यता आहे.

Related posts: