|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » भारत-सोमालिया यांच्यात करार, कैद्यांची अदलाबदली

भारत-सोमालिया यांच्यात करार, कैद्यांची अदलाबदली 

नवी दिल्ली

: आफ्रिकेच्या देशांसोबत भारत सध्या आपली जवळीक वाढविण्यासाठी पावले टाकतोय. मंगळवारी भारत आणि सोमालियाने एका महत्त्वपूर्ण करारावर स्वाक्षरी केली. या करारानुसार दोन्ही देशांच्या शिक्षा झालेल्या नागरिकांची भारत आणि सोमालिया यांच्यादरम्यान अदलाबदली केली जाणार आहे. सोमालियाचे विदेशमंत्री युसूफ गराड उमर आणि विदेशमंत्री सुषमा स्वराज यांच्यात झालेल्या बैठकीनंतर विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाळ बगळे यांनी कराराची माहिती दिली. वर्षाच्या प्रारंभी विदेशमंत्री झाल्यावर उमर यांचा हा पहिला भारत दौरा आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने जून महिन्यात या करारावर आपले शिक्कामोर्तब केले होते. जानेवारी महिन्यात सागरी चाच्यांनी पकडलेल्या 10 भारतीयांची सुटका करविल्याप्रकरणी भारताने सोमालियाचे आभार मानले होते. सागरी चाच्यांनी येमेननजीक हिंदी महासागरात या भारतीयांचे अपहरण केले होते. सोमालियन सुरक्षा दलांनी नौकेची चाच्यांपासून सुटका करविली होती.

Related posts: