|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » सिध्देश्वर कारखान्याची चिमणी पाडणार

सिध्देश्वर कारखान्याची चिमणी पाडणार 

सोलापूर / वार्ताहर

सोलापूरातील विमानतळातील शेजारी असलेल्या श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडण्याविषयी सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून विमानसेवेतील हा अडथळा लवकरच दूर करण्यात येईल, माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दै. तरूण भारत संवादशी बोलताना दिली.

सोलापूरातील होटगी रस्त्यावर विमानतळ असून विमानतळाशेजारीच काही अंतरावर सिध्देश्वर कारखाना आहे. यात धूर सोडण्यासाठी चिमणी असून ही चिमणी विमानसेवेत अडथळा ठरत होती. याबाबतचा अहवाल विमानतळ प्राधिकरणाने जिल्हा प्रशासनाला दिला होता. त्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांनी पाहणी करून पाडण्याचे आदेश दिले होते. याच्याविरूध्द कारखाना प्रशासनाने अपिल केले होते. हे अपिल फेटाळले होते. त्यामुळे चिमणी पार पाडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विमानसेवेला अडथळा ठरत असलेली ही चिमणी पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने टेंडर मागवले असून या टेंडरला प्रतिसाद मिळाला असून लवकरच चिमणी पाडण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.

Related posts: