|Friday, November 15, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » गुजरातमध्ये भाजपाच्या विरोधात वातावरण

गुजरातमध्ये भाजपाच्या विरोधात वातावरण 

काँग्रेस पक्षाला झालं तरी आहे काय, हा प्रश्न लोकांच्या मनात येणं स्वाभाविक आहे. काँग्रेस नेतृत्वाचा पक्षावर प्रभाव किंवा नियंत्रण नाही. नेतेमंडळी पक्ष सोडत आहेत आणि त्यातले बहुसंख्य भाजपात प्रवेश करत आहेत. पक्षाला सोडचिठ्ठी देणाऱयांना थांबविण्याचा प्रयत्न होताना दिसत नाही. काँग्रेसचे नेतृत्व नैराश्यात आहे. नेतृत्वानी आत्मविश्वास गमावला आहे की काय, असा प्रश्न निर्माण होतो. भाजपाच्या आक्रमक पवित्र्यासमोर काँग्रेस हतबल झाली असल्याचं चित्र आहे. रोज कोणीतरी काँग्रेस सोडून भाजपा किंवा इतर पक्षात सामील होत असल्याची बातमी आपण ऐकत आहोत. काँग्रेस नेतृत्वाकडून अशा स्वरूपाची परिस्थिती बदलण्यासाठी फारसा प्रयत्न होत असताना दिसत नाही. ही गोष्ट काँग्रेस आणि लोकशाहीसाठी चांगली नाही. लोकशाही मजबूत होण्यासाठी प्रभावी विरोधी पक्षाची आवश्यकता असते. दुर्दैवाने, आज प्रभावी विरोधी पक्ष नाही.

गेल्या काही दिवसात गुजरात, बिहार, आणि उत्तर प्रदेशात घडलेल्या काही घटनांमुळे काँग्रेसबद्दल प्रश्न निर्माण झाले आहेत. गुजरातमध्ये या वर्षाच्या शेवटी निवडणूक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि भाजपासाठी गुजरात विधानसभा निवडणूक महत्त्वाची आहे. काँग्रेससाठी देखील गुजरातची निवडणूक प्रति÷sची आहे. भाजपानी किमान 150 जागांवर विजय मिळविण्याचा संकल्प केला आहे. भाजपाची तसं जम्मू आणि काश्मीरच्या निवडणुकीत मिशन 45 ठरवलं होतं. पण तसं होणं शक्मय नव्हतं आणि झालं ही नाही. माधवसिंह सोलंकीच्या नेतृत्वखाली 1985 च्या निवडणुकीत काँग्रेसनी 149 जागांवर विजय मिळवलेला. हा एक विक्रम आहे. अमित शहाना हा विक्रम तोडायचा आहे आणि म्हणून ‘मिशन 150.’

गुजरात विधानसभेच्या निवडणुकींच्या दृष्टीने भाजपाची पावलं उचलायला, काही महिन्यापासून सुरुवात केली आहे. नरेंद्र मोदीचे गुजरातचे दौरे वाढले आहेत. राज्याच्या वेगवेगळय़ा भागात जाऊन सभा घेणं, लोकांना भेटणं त्यांनी सुरू केलं आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड यशामुळे कार्यकर्ते उत्साहात आहेत. मात्र, सर्वसामान्य लोकांमध्ये उत्साह दिसत नाही. अनेक वर्षे राज्यात भाजपाची सत्ता असली तरी लोकांच्या वाटय़ाला अद्याप ‘अच्छे दिन’ आलेले नाहीत, देशभरात चर्चा होणाऱया ‘विकासाच्या गुजरात मॉडेलनी’ लोकांच्या जीवनात ‘अच्छे दिन’ आणलेले नाहीत. सामान्य माणसांच्या परिस्थितीत काहीही फरक पडलेला नाही. आणि म्हणून प्रामुख्याने शेतकरी असलेला पटेल समाज भाजपाच्या राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरला आहे. दलितांवर होणाऱया अत्याचारांबद्दल दलित समाजात प्रचंड असंतोष आहे. गेल्या वषी उना येथे दलित तरुणांना केलेल्या मारहाणीनंतर राज्याचा दलित समाज संघटित होत असताना दिसत आहे. मुस्लीम समाज तर भाजपाच्या विरोधातच आहे. इतर मागासलेल्या जातींमध्ये पण भाजपाच्या विरोधात वातावरण आहे. ही मंडळी स्वतंत्ररित्या त्यांच्या पद्धतीने सरकारच्या विरोधात आंदोलन करत आहेत. इतर राज्यांप्रमाणे गुजरातेत पण शेतकरी आत्महत्या करत आहेत. या व्यतिरिक्त, गुजरातेत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ज्वलंत आहे. सौराष्ट्र आणि कच्छमध्ये हा प्रश्न प्रकर्षाने जाणवतो.

या सगळय़ाचा उघड उघड अर्थ गुजरातेत भाजपाच्या विरोधात वातावरण आहे. भाजपाला याची जाणीव आहे आणि म्हणून फोडाफोडीचे राजकारण त्यांनी सुरू केलं आहे. गुजरात विधानसभेच्या विरोधी पक्ष नेते आणि संघपरिवारातून भाजपामार्गे काँग्रेसमध्ये आलेल्या शंकरसिंह वाघेलाचा काँग्रेस सोडण्याचा निर्णय काँग्रेससाठी अडचणीचा आहे. भाजपात ते सामील होणार नाहीत. म्हणजे ते गुजरातपुरता मर्यादित एखादा पक्ष बनवतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस व इतर लहान पक्षांसोबत ते युती करतील. गुजरात विधानसभेत राष्ट्रवादीचे दोन आमदार आहेत. काँग्रेसमध्ये शंकरसिंह एकमात्र लोकांचे नेते, त्यांना प्रचंड जनाधार आहे, वाघेलांनी काँग्रेस सोडली असल्यामुळे काँग्रेस कमजोर होईल. धर्मनिरपेक्ष मताचे विभाजन होईल आणि त्याचा भाजपाला होईल, असं म्हटलं जातं. आपल्याला निवडणुकापूर्वीच मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करावा, असा आग्रह वाघेलांचा होता. परंतु, काँग्रेसचे दिल्लीतील नेते आणि इतरांना त्याची आवश्यकता वाटली नाही. वाघेलांकडे ते सतत दुर्लक्ष करत होते. वाघेलाना समजून सांगण्याची आवश्यकता देखील काँग्रेसला वाटली नाही. आज वाघेला एवढा जनाधार असलेला एकही नेता काँग्रेसकडे नाही. प्रदेशाध्यक्ष भरतसिंग सोलंकी आणि शक्तीसिंग गोहीलचा प्रभाव त्यांच्या मतदारसंघापुरता आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधीचे राजकीय सल्लागार अहमद पटेलचा तर तेवढाही प्रभाव नाही. 8 ऑगस्टला होणाऱया राज्यसभेच्या निवडणुकांसाठी ते उभे आहेत. वाघेला आणि त्यांचे सहकारी कोणाला मतदान करताना त्यावर अहमद पटेल यांचे भवितव्य ठरणार. काँग्रेसच्या काही आमदारानी तर विधानसभेच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला आहे.

निवडणुकांच्या वर्षात नेतेमंडळी कोणालाही नाराज करत नसतात. परंतु, काँग्रेसच्या बाबतीत काहीतरी वेगळंच घडतं. राजकारणात असलेल्या माणसांनी 24ƒ7 सक्रिय असावं लागतं. एकेकाळी काँग्रेसची नेतेमंडळी सतत उपलब्ध असायची. परंतु, आताची परिस्थिती वेगळी आहे. भाजपाचे नेते आता 24ƒ7 सक्रिय असतात. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी इतर कार्यकर्ते आाणि नेत्यासाठी देखील सहज उपलब्ध नसतात. पटेल समाजाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 2015 साली झालेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत काँग्रेसचा प्रचंड विजय झालेला काँग्रेसच्या बाजूने वातावरण निर्माण झालेलं. त्या वातावरणाचा फायदा करून घेण्यास काँग्रेसच्या नेतृत्वला यश मिळालं नाही. त्या विजयानंतर शंकरसिंग वाघेला दिल्लीला गेले पण राहुल गांधी त्यांना भेटले नाहीत अशा प्रकारची तक्रार पक्षाच्या अनेक नेत्यांची आहे. राजकारण सकाळी दहा ते सायंकाळी पाच, असं होत नाही. कुठे तरी गंभीरतेच्या अभावामुळे गोवा आणि मणिपूर राज्य गमावण्याची पाळी काँग्रेसवर अलीकडेच आलेली, हे विसरता कामा नये.

एकीकडे आत्मविश्वास गमावलेलं काँग्रेसचं नेतृत्व आणि दुसरीकडे, आक्रमक भाजप. कुठल्याही परिस्थितीत सत्ता काबीज करणं, हा त्यांचा उद्देश. आयाराम, गयारामला प्रोत्साहन देण्याची त्यांची नीति, प्रथा, परंपरा, संकेत इत्यादींचा विचार न करता सत्ता मिळविण्यासाठी राज्यपालांच्या उघड उघड वापर करणं, याला भाजपाने त्याचं धोरण बनवलं आहे. गोवा आणि मणिपुरात सर्वात मोठय़ा असलेल्या काँग्रेस पक्षाला सरकार बनविण्याची संधी त्या राज्यांच्या गव्हर्नरांनी नाकारली. एकदा सत्ता हातात आली की मग लहान लहान पक्ष आणि अपक्षांचे समर्थन मिळवणं सोपं असतं. इतर काही राज्यात पण गव्हर्नरांचा वापर केला गेला आहे. बिहारमध्ये तर मतदारांनी त्यांचा कौल भाजपाच्या विरोधात दिला होता. पण आता नितीशकुमारच्या सोबत भाजपा सत्तेत आला आहे. तत्त्वाच्या गोष्टी सांगणाऱया भाजपा आणि नितीशकुमारचे संधीसाधू राजकारण आता उघड झालं आहे. 2015 च्या बिहार निवडणुकीत नितीशकुमारच्या जनता दल (यू.) लालू प्रसादांच्या राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसमध्ये महागठबंधन झालं होतं. या महागठंबंधननी भाजपाचा पराभव केला आणि आता जनता दल (भू) व भाजपा एकत्र आले व सरकार बनवलं. महागठबंधनात काँग्रेसच स्थान तिसरं होतं. नितीश आणि लालूमधल्या वादात राहुलनी महत्वाची भूमिका पार पाडायला हवी होती. एक राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेसनी त्या दोघांमध्ये समजुती घडवून आणायला हवी होती. परंतु, त्यात ही काँग्रेसला यश मिळालं नाही. एकेकाळी काँग्रेसचं नेतृत्व लोकांना समजावून सांगत होती. भाजपानी तर उघड उघड फोडाफोडीच राजकारणच सुरू केलं आहे. आजचं भाजपाच राजकारण आधीच्या काँग्रेसच्या राजकारण सारखचं आहे.

शंकरसिंग वाघेलानी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली त्याला बऱयाच प्रमाणात काँग्रेसचं नेतृत्व जबाबदार आहे, वाघेलांसोबत गुजरातमध्ये सत्तेत येण्याची शक्मयता देखील काँग्रेसनी घालवली. आजचा काँग्रेस अनुभवापासून शिकत नाही, ही सर्वात दुर्दैवी गोष्ट आहे. अनुभवातून जो माणूस, संघटना शिकत नाही त्यांचा विकास होत नसतो. अनुभवातून जो शिकतो तोच पुढे जात असतो. काँग्रेसनी प्रामाणिकपणे आत्मचिंतन करण्याची गरज आहे. काँग्रेसनी एक प्रभावी विरोधी पक्ष म्हणून उभं राहावं, असं अनेकांना वाटतं. लोकशाहीसाठी देखील प्रभावी विरोधी पक्ष असणं आवश्यक आहे.

Related posts: