|Sunday, June 16, 2019
You are here: Home » Top News » अब्बासीच राहणार पंतप्रधानपदी : नवाज शरीफ

अब्बासीच राहणार पंतप्रधानपदी : नवाज शरीफ 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

पाकिस्तानचे हंगामी पंतप्रधान शाहिद खाकन अब्बासी हे येत्या 10 महिन्यांपर्यंत पंतप्रधानपदावर कायम राहणार असल्याचे संकेत पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी दिले आहेत.

पनामा पेपर्सप्रकरणी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने शरीफ यांना पंतप्रधानपदापासून दूर केले होते. त्यानंतर शरीफ यांनी त्यांचे बंधू शाहबाज यांना उत्तराधिकारी म्हणून नियुक्तही केले होते. अब्बासी यांना 45 दिवसांसाठी पंतप्रधानपदी नियुक्त केले होते. तसेच जोपर्यंत शाहबाज इस्लामाबादमध्ये येत नाहीत. तोपर्यंत अब्बासी यांची हंगामी पंतप्रधान म्हणून नियुक्त करण्यात आली. मात्र, आता अब्बासी हेच पंतप्रधानपदावर कायम राहतील, असे संकेत नवाज शरीफ यांनी दिले आहेत.