|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » leadingnews » उपराष्ट्रपती निवडणूक ; नायडू, गोपाळकृष्ण गांधी यांच्यात उद्या लढत

उपराष्ट्रपती निवडणूक ; नायडू, गोपाळकृष्ण गांधी यांच्यात उद्या लढत 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

उपराष्ट्रपतिपदासाठी उद्या निवडणूक होत आहे. या पदासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून वेंकय्या नायडू यांना तर विरोधी पक्षांकडून गोपाळकृष्ण गांधी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये उद्या लढत होणार आहे.

उपराष्ट्रपती डॉ. हमीद अन्सारी यांच्या पदाचा कार्यकाळ येत्या 10 ऑगस्टला पूर्ण होत आहे. त्यामुळे रिक्त होणाऱया या पदासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि काँग्रेससह इतर 17 विरोधी पक्षांकडून उमेदवार देण्यात आले आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून माजी केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांना उमेदवारी देण्यात आली असून, विरोधी पक्षांकडून महात्मा गांधी यांचे नातू आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपाळकृष्ण गांधी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

उद्या (शनिवारी) सकाळी दहा वाजता मतदान होणार आहे. ही मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उद्याच याचा निकाल जाहीर केला जाणार आहे.

Related posts: