|Monday, September 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » सर्वाधिक घातक पाणबुडीमुळे बळ

सर्वाधिक घातक पाणबुडीमुळे बळ 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

चीनसोबत डोकलाम भागात सुरू असलेल्या वादादरम्यान भारतीय नौदल आपले सामर्थ्य वाढविण्यास सज्ज आहे. चालू महिन्यात नौदलाला जगाच्या सर्वाधिक घातक पाणबुडींपैकी एक आयएनएस कल्वरी मिळण्याची अपेक्षा आहे. स्कॉर्पिन वर्गातील ही पाणबुडी ताफ्यात सामील झाल्याने भारतीय नौदलाला मोठा दिलासा मिळेल.

आयएनएस कल्वरी भारतीय नौदलासाठी मैलाचा दगड ठरेल असे मानले जातेय. याच्या समावेशानंतर देशाच्या पाण्याच्या आतील लढाईचे सामर्थ्य मोठय़ा प्रमाणात वाढेल. भारताने अशा 6 पाणबुडय़ांची मागणी केली होती, ज्यातील कल्वरी पहिली असणार आहे. आयएनएस कल्वरीची निर्मिती फ्रान्सची कंपनी डीसीएनएससोबत मिळून मुंबईस्थित माझगाव डॉकयार्डमध्ये झाली आहे. आयएनएस कल्वरी नाव एकप्रकारच्या शार्क माशापासून प्रेरित आहे.

आयएनएस कल्वरी ऑगस्ट महिन्यात नौदलाला सोपविली जाऊ शकते. याच्या सर्व चाचण्या यशस्वी ठरल्या असून याच्या समावेशाची अंतिम तारीख अजून निर्धारित व्हायची असल्याचे माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडचे अध्यक्ष राकेश आनंद यांनी सांगितले होते.

पाणबुडीची वैशिष्टय़े

? आयएनएस कल्वरी डिझेल आणि इलेक्ट्रिक ऊर्जेने संचालित पाणबुडी असून यात असणारी मार्गदर्शक शस्त्रास्त्रs शत्रूवर अचूक हल्ला करून त्याला उद्धवस्त करण्याचे सामर्थ्य बाळगतात. पाणतीरासोबत हल्ल्यांसह याद्वारे पाण्याच्या आतदेखील हल्ला केला जाऊ शकतो. त्याचबरोबर पृष्ठभागावर पाण्याच्या आतून शत्रूवर हल्ला करण्याची क्षमता याच्यात आहे. 

? कोणत्याही प्रकारच्या युद्धात वापरता येईल अशाप्रकारे या पाणबुडीची रचना करण्यात आली असून यात दुसऱया नौदल कृती दलासोबत सहजपणे संपर्क साधता येईल अशाप्रकारची यंत्रणा यात समाविष्ट आहे.

?          स्कॉर्पिन पाणबुडी सर्व प्रकारच्या युद्धावस्था, पाणबुडींचा संघर्ष आणि गुप्त माहिती जमा करण्याच्या कार्यांना उत्तमप्रकारे सामोरे जाण्यास सक्षम आहे. या पाणबुडीला वेपन्स लाँचिंग टय़ूब्सने सज्ज करण्यात आले असून याद्वारे समुद्राच्या मधोमधच शस्त्रास्त्रs चढविता येतील आणि कोणत्याही क्षणी हल्ला करता येईल.