|Tuesday, November 19, 2019
You are here: Home » leadingnews » उपराष्ट्रपतिपदासाठी मतदानाला सुरूवात

उपराष्ट्रपतिपदासाठी मतदानाला सुरूवात 

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :

देशाला आज नवा उपराष्ट्रपती मिळणार आहे. भाजप व राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे व्यंकय्या नायडू आणि अठरा विरोधी पक्षांचे एकत्रित उमेदवार डॉ. गोपाळकृष्ण गांधी यांच्यामध्ये आज लढत होईल. एनडीएकडील बहुमत लक्षात घेता नायडूंचा विजय निश्चित आहे.

आज सकाळी 10 ते सायंकाळ पाच वाजेपर्यंत मतदान असेल आणि त्यानंतर सायंकाळी सात वाजता मतमोजणीला सुरूवात होईल. रात्री आठ ते साडेआठ दरम्यान अधिकृत निकाल जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उपराष्ट्रपतिपदासाठी लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार मतदान करणार आहेत. या निवडणूकीत 710 मतदार असून स्वतः एनडीएकडे सव्वाशे मते आहेत. शिवाय त्यांना अण्णाद्रमुक, तेलंगणा राष्ट्र समिती आणि वायएसआर काँग्रेससारख्या काही कुंपणावरच्या पक्षांचा पाठिंबा आहे. त्यामुळे विजयासाठी 396 मतांची आवश्यकता असताना नायडूंना मिळणाऱया मतांची संख्या पाचशेचा टप्पा गाठण्याचा अंदाज आहे.

 

Related posts: