|Tuesday, November 19, 2019
You are here: Home » leadingnews » व्यंकय्या नायडू देशाचे नवे उपराष्ट्रपती

व्यंकय्या नायडू देशाचे नवे उपराष्ट्रपती 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

देशाचे नवे उपराष्ट्रपती म्हणून राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार व्यंकय्या नायडू यांचा विजय झाला. तर विरोधी पक्षांचे उमेदवार गोपाळकृष्ण गांधी यांचा पराभव झाला. नायडू यांना 516 तर गांधी यांना 244 मतं मिळाली.

उपराष्ट्रपती डॉ. हमीद अन्सारी यांच्या पदाचा कार्यकाळ येत्या 10 ऑगस्टला पूर्ण होत आहे. त्यामुळे या रिक्त होणाऱया जागेसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून माजी केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांना उमेदवारी देण्यात आली होती. तसेच विरोधकांकडून महात्मा गांधी यांचे नातू आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपाळकृष्ण गांधी यांना उमेदवारी देण्यात आली होती.

आज सकाळी 10 वाजता मतदानाला सुरुवात झाली. संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांनी मतदान केले. सायंकाळी 5 वाजता मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर निकाल हाती लागले असून, अपेक्षेप्रमाणे नायडू विजयी झाले आहेत. दरम्यान, नायडू यांचा शपथविधी येत्या 11 ऑगस्टला होणार आहे.

Related posts: