|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » leadingnews » उत्तरप्रदेशात दहशतवाद्याला अटक ; एटीएसची कारवाई

उत्तरप्रदेशात दहशतवाद्याला अटक ; एटीएसची कारवाई 

ऑनलाईन टीम / लखनौ :

उत्तरप्रदेशमधील मुझफ्फरनगरमधून एका बांगलादेशी दहशतवाद्याला अटक करण्यात दहशतवादविरोधी पथकाला यश मिळाले आहे. या दहशतवाद्याला कुटेसरा, जनपद मुझफ्फरनगर येथून अटक करण्यात आली आहे.

अब्दुल्लाह असे त्याचे नाव असल्याची माहिती मिळत आहे. तो मूळचा बांगलादेशातील नागरिक असून, बनावट आधार कार्ड आणि पासपोर्टच्या आधारे गेल्या अनेक वर्षांपासून तो भारतात राहत होता. उत्तरप्रदेश दहशतवादविरोधी पथकाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक ब्रिजेश श्रीवास्तव यांच्या नेतृत्त्वाखालील पथकाने ही कारवाई केली. अब्दुल्लाह हा दहशतवादी बनावट ओळखपत्राच्या साहाय्याने बांगलादेशी दहशतवाद्यांना पासपोर्ट काढून देण्याचे काम करत असल्याचे सांगितले जात आहे.

Related posts: