|Friday, October 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » डी. एड्. अभ्यासक्रमाला ‘ग्रहण’!

डी. एड्. अभ्यासक्रमाला ‘ग्रहण’! 

विक्रम चव्हाण / सांगली

शिक्षक भरतीवर शासनाने घातलेले निर्बंध, ‘टाईट’ असलेली ‘टीईटी’ परीक्षा,  नोकरीची नसलेली शाश्वती यामुळे प्राथमिक शिक्षण पदविका (डी.एड्.) अभ्याप्रमाला ‘ग्रहण’ लागले आहे. विद्यार्थ्यांचा या अभ्यासक्रमाला अल्प प्रतिसाद मिळत असल्याने यंदा जिह्यातील 33 पैकी 6 डी.एड्. महाविद्यालयांना टाळे लागले आहे. 9 महाविद्यालयाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे. तर उर्वरित 19 महाविद्यालयामध्ये केवळ 324 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याने या महाविद्यालयात अद्यापनाचे काम करणाऱया प्राध्यापकांच्या नोकऱयांवरही गंडांतर आले आहे. 

डी. एड्. म्हणजे शिक्षक होण्याची नामी संघी असे समीकरणच गत 10 व
र्षापूर्वी रुढ झाले होते. डी.एड्.चा अभ्यासक्रम पूर्ण केलेले अनेक जण या काळात शिक्षक झाले. यामुळे डी.एड्.ची लोकप्रियता वाढली. राज्यात डी.एड्. महाविद्यालयांचे अक्षरशः पेव फुटले. 80 त 85 टक्क्यांची मेरीट लिस्ट लागू लागली. यामुळे या अभ्यासक्रमाकडे ओढा असलेले विद्यार्थी भरमसाठ फी भरून विनाअनुदानीत महाविद्यालयांच्यामध्ये प्रवेश घेउढ लागले. याचा परिणाम मात्र उलटा झाला मोठय़ा प्रमाणात विद्यार्थी डी. एड्.चा अभ्यासक्रम पूर्ण करुन बाहेर पडू लागले. त्या प्रमाणात शिक्षक भरती मात्र कमी प्रमाणात होउढ लागली. 2010 मध्ये शासनाने शिक्षकांच्या भरतीवरच बंदी घातली. आणि अभ्याक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांच्या कपाळावर ‘मास्तर’ असा शिक्का बसण्याऐवजी ‘सुशिक्षित बेरोजगार’ असा शिक्का बसू लागला. यामुळे मास्तर तयार करणारी डी. एड्. महाविद्यालये सुशिक्षीत बेरोजगार निर्माण करणारे कारखाने झाले आहेत.

यंदा सहा महाविद्यालये बंद

शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱया विद्यार्थ्यांनी नोकरी मिळत नसल्याने या अभ्यासक्रमाकडे पाठ फिरवायला सुरूवात केली. सन 2013 पासून खऱया अर्थाने या अभ्यासक्रमाला ग्रहण लागले. ते अद्यापपर्यंत सुटायला तयार नाही. जिल्हयात डी. एड. अभ्यासक्रम शिकविणारी सुमारे 33 महाविद्यालये आहेत. जत, कवठेमहांकाळ, आटपाडी या दुष्काळी तालुक्यांमध्ये डी. एड्. महाविद्यालयांचे अक्षरशः पेवच फुटले हेते. विद्यार्थ्यांचाही मोठा प्रतिसाद या महाविद्यालयांना मिळाला होता. मात्र केवळ सात वर्षातच या महाविद्यालयांना कुलपे लावण्याची वेळ संस्थाचालकांच्यावर आली आहे. 33 महाविद्यालयांपैकी सहा महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या अभावी यापूर्वीच त्यांचा गाशा गुंडाळला आहे. तर चालू शैक्षणिक वर्षात 9 महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेशच घेतला नाही. यामुळे ही महाविद्यालयेही अखेरच्या घटका मोजत आहेत.

19 महाविद्यालये तग धरून

जिह्यातील 19 डी. एड्. महाविद्यालये आतापर्यंत कशीबशी तरली आहेत. तरीही या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता 727 इतकी असताना चालू शैक्षणिक वर्षात केवळ 324 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी 12 वीचा निकाल लागल्यानंतर लगेच प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली. जुलैच्या शेवटच्या आठवडय़ापर्यंत ही प्रक्रिया पूर्ण झाली. मात्र विद्यार्थ्यांचा अपेक्षीत प्रतिसाद मिळाला नाही. डी. एड्. अभ्यासक्रम पूर्ण करुन सुशिक्षीत बेरोजगार होण्यापेक्षा आयटीआय सारख्या व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केला तरी नोकरी तरी मिळेल या मानसिकतेमधून विद्यार्थ्यांनी डी.एड्.कडे दुर्लक्ष केले. याचा मोठा फटका डी. एड. महाविद्यालयांना बसू लागला आहे.

नोकऱयांवर गंडातर

विद्यार्थ्यांअभावी डी.एड्. महाविद्यालयांना टाळे लावण्याची वेळ संस्थाचालकांच्यावर आल्याने या महाविद्यालयांमध्ये अद्यापनाचे काम करणाऱया शिक्षकांच्या नोकऱयांवरही गंडातर आले आहे. अनेक शिक्षक विद्यार्थ्यांच्याप्रमाणेच सुशिक्षीत बेरोजगार झाले आहेत. काही ठिकाणी प्राध्यापक अतिरिक्त झाले आहेत. त्यांच्या समायोजनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. 

डी. एड्. धारक रोजंदारीवर

डी. एड. ची पदवी प्राप्त केल्यानंतर शिक्षक होण्यासाठी शासनाने मध्यवर्ती निवड चाचणी परिक्षा (सीईटी) बंधनकारक केली होती. सीईटी मधून निवड होणाऱयांना शासकीय सेवेत सामावून घेतले जात होते. मात्र राज्यातील शिक्षक क्षमतेचा विचार करुन शासनाने सीईटी बंद केली. यामुळे अनेक डी.एड्. धारकांना नोकरीपासून वंचित राहावे लागले. यानंतर शासनाने शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) सुरु केली. या परीक्षेचा निकाल दोन ते चार टक्क्याच्यावर कधी जात नाही. यामुळे बेरोजगार झालेल्या डी. एड्. धारकांना पोटाची खळगी भरण्यासाठी रोजंदारीवर कामाला जाण्याची वेळ आली आहे.

….तरच चित्र वेगळे दिसेल : डॉ. सलगर

प्राथमिक शिक्षण स्तरावर डी. एड्. अभ्यासक्रमाला मरण नाही. पण शिक्षकांच्या भरतीवर शासनाने घातलेल्या निर्बंधामुळे विद्यार्थ्यांना डी.एड्. करुन नोकरी मिळेलच याची खात्री वाटत नाही. यामुळे या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवायला सुरूवात केली आहे, ही वस्तुस्थिती आहे. हे नाकारता येणार नाही. शासनाने शिक्षकांच्या भरतीवरील बंदी उठवली तर मात्र चित्र वेगळे दिसेल.