|Monday, September 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे गर्दी

श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे गर्दी 

प्रतिनिधी/ महाबळेश्वर

श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी भाविकांच्यावतीने श्रावणी सोमवारनिमित्त श्री महाबळेश्वराचे दर्शन घेण्यासाठी येणाऱया भाविकांना स्वयंस्फुर्तीने प्रसादाचे वाटप करण्यात येत आहे. तहसीलदार रमेश शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील भाविकांच्या दर्शनाच्या व्यवस्थेची देखभाल श्री क्षेत्र महाबळेश्वर देवस्थान ट्रस्टचे व्यवस्थापक देवेंद्र जगताप करीत आहेत.

  श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे भगवान श्री ब्रह्मा, विष्णू व महेश यांचे वास्तव्य आहे, असे भाविक भक्तांचा समज आहे. येथील शिवलिंग हे त्रिगुणात्मक असून भक्तांची मनोकामना पूर्ण करणारे एक अत्यंत रमणीय व पवित्र तिर्थस्थान आहे. सध्या येथे श्रावण महिना व कन्यागत महापर्वकाळ सुरु असल्याने या तीर्थक्षेत्री भाविकांची मोठी गर्दी होत आहे. महाराष्ट्रासह भाविक मोठय़ा संख्येने कर्नाटक, आंध्र प्रदेश व तेलंगण राज्यातून येथे दर्शनाचा लाभ घेण्यासाठी येत आहेत.

   श्री श्रेत्र महाबळेश्वर देवस्थान ट्रस्ट वतीने दर्शनासाठी येणाया भाविकांसाठी वाहनतळाची योग्य व्यवस्था राखण्यात आली आहे. श्री क्षेत्र महाबळेश्वर ग्रामपंचायतीच्यावतीने शहरात स्वच्छता राखण्यात आली आहे. तर, वन व्यवस्थापन समितीच्यावतीने भक्तांसाठी योग्य त्या सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

 

  चौकट — महाबळेश्वर पासून श्री क्षेत्र महाबळेश्वरकडे जाणाया व डचेस रोड या दोन्ही रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणात खड्डे पडले आहेत. महाबळेश्वर नगरपालिकेने या रस्त्यांवर तात्पुरत्या स्वरुपात मुरुम टाकून खड्डे मुजविण्याचे काम सुरु केले आहे. परंतू या दोन्ही रस्त्यांवरुन जाताना दाट धुक्यामुळे रस्त्यापुढचे दिसण्यास अनेकवेळा वाहकांना तारेवरची कसरत करावी लागते त्यामुळे या दोन्ही रस्त्यांना रिफ्लेक्टर्स बसविण्याची मागणी भाविकातून होत आहे.