|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » उद्योग » नफाकमाईने बाजारात घसरण

नफाकमाईने बाजारात घसरण 

बीएसईचा सेन्सेक्स 259, एनएसईचा निफ्टी 79 अंशाने घसरला

वृत्तसंस्था/ मुंबई

भांडवली बाजारात नफावसुली दिसून आली. मात्र सुरुवातीला बाजारात किंचित तेजी आली होती. वरच्या पातळीवर नफाकमाई झाल्याने बाजारात घसरण झाले याचप्रमाणे शेल कंपन्यांविरोधात सेबीकडून आदेश काढण्यात आल्याने बाजारात त्याचा परिणाम दिसून आला. दिवसातील व्यवहारादरम्यान निफ्टी 9,947 आणि सेन्सेक्स 31,915 पर्यंत घसरला होता.

बीएसईचा सेन्सेक्स 259 अंशाने घसरत 32,014 वर बंद झाला. एनएसईचा निफ्टी 79 अंशाच्या कमजोरीने 9,978 वर स्थिरावला.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागात विक्री झाली. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 1.2 टक्क्यांनी घसरत बंद झाला, तर निफ्टी मिडकॅप 100 निर्देशांक 1.2 टक्क्यांनी कमजोर झाला. बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक 1.3 टक्क्यांनी घसरला.

धातू कंपन्यांचा निर्देशांक वगळता सर्व क्षेत्रात घसरण झाली. निफ्टीचा धातू निर्देशांक 1.5 टक्क्यांनी वधारत बंद झाला. निफ्टीचा वाहन निर्देशांक 0.4 टक्के, एफएमसीजी निर्देशांक 1.2 टक्के, आयटी निर्देशांक 0.5 टक्के, मीडिया निर्देशांक 1 टक्के, औषध निर्देशांक 1.1 टक्के आणि पीएसयू बँक निर्देशांक 2.4 टक्क्यांनी घसरले.

बीएसईचा भांडवली वस्तू निर्देशांक 1 टक्के, ग्राहकोपयोगी वस्तू निर्देशांक 0.3 टक्के, तेल आणि वायू निर्देशांक 2.2 टक्के, ऊर्जा निर्देशांक 1.9 टक्के आणि स्थावर मालमत्ता निर्देशांक 4.5 टक्क्यांनी घसरला.

दिग्गज समभागांची कामगिरी

वेदान्ता, हिंडाल्को, टाटा स्टील, सिप्ला, गेल, बजाज ऑटो आणि भारती एअरटेल 3.5-0.3 टक्क्यांनी मजबूत झाले. डॉ. रेड्डीज लॅब, बीपीसीएल, आयओसी, भारती इन्फ्राटेल, भेल, कोल इंडिया, एसबीआय आणि आयटीसी 5-2.1 टक्क्यांनी कमजोर झाले.

मिडकॅप समभागात एमआरपीएल, जेएसडब्ल्यू एनर्जी, भारत फोर्ज, बर्जर पेन्ट्स आणि इंडियन हॉटेल्स 5.3-1 टक्क्यांनी वधारले. टोरेन्ट फार्मा, एचपीसीएल, सन टीव्ही, रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि ओबेरॉय रिअल्टी 4.8-3.9 टक्क्यांनी घसरले.

स्मॉलकॅप समभागात पीसी ज्वेलर, दिलीप बिल्डकॉन, जमना ऑटो, गुडरिक ग्रुप आणि इगरशी मोटर्स 7.5-6 टक्क्यांनी वधारले. एचडीआयएल, जेबीएफ इन्डस्ट्रीज, द्वारिकेश शुगर, जयप्रकाश असोसिएट्स आणि गुजरात बोरोसिल 18-75-9.2 टक्क्यांनी घसरले.

Related posts: