|Tuesday, November 12, 2019
You are here: Home » leadingnews » मराठा आरक्षणासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करणार

मराठा आरक्षणासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करणार 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीला याबाबतचे निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले असून, समितीच्या निर्णयाला मंत्रिमंडळाच्या मान्यतेची गरज राहणार नाही.

क्रांतीदिनाचे औचित्य साधून मुंबईत मराठा आरक्षणासाठी मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. जिजामाता मैदान ते आझाद मैदान असा या मोर्चाचा मार्ग असणार आहे. राज्यातील मराठा समाजातील बांधवांना आरक्षण मिळावे, यांसारख्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात येत आहे. यामध्ये मराठा आरक्षणासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीच्या निर्णयाला मंत्रिमंडळाच्या मान्यतेची गरज राहणार नाही. याशिवाय, मराठा समाजातील विद्यार्थ्यांना 6 लाखांच्या ईबीसी मर्यादेसाठी 60 टक्के गुणांची अट 50 टक्के करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

Related posts: