|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » उद्योग » टाटा मोटर्स : जून तिमाहीच्या नफ्यात 42 टक्क्यांनी वाढ

टाटा मोटर्स : जून तिमाहीच्या नफ्यात 42 टक्क्यांनी वाढ 

वृत्तसंस्था/ मुंबई

टाटा मोटर्सकडून जून तिमाहीचा निकाल प्रसिद्ध करण्यात आला. या कालावधीत कंपनीच्या नफ्यात 42 टक्क्यांनी वाढ झाली असून 3,182 कोटी रुपयांवर पोहोचला. गेल्या वर्षी समान कालावधीत हा आकडा 2,236 कोटी रुपये होता. या कालावधीत कंपनीच्या एकूण उत्पन्नात 10 टक्क्यांनी घट होत 59,972 वर पोहोचला. गेल्या वर्षी हा आकडा 66,339 रुपये होता.

कंपनीने जग्वार लँड रोव्हरच्या निवृत्तीवेतन योजनेमध्ये बदल केल्याने त्याचा फायदा दिसून आला. यामुळे कंपनीला 3,609 कोटी रुपयांचा लाभ झाला आहे. या कालावधीत कंपनीच्या एकूण विक्रीत 11.8 टक्क्यांनी घट होत 1,11,860 युनिट्सवर पोहोचला आहे. अपेक्षेप्रमाणे निकाल लागला नाही. जग्वार लँड रोव्हरची विक्री योग्य न झाल्याने कंपनीच्या कामगिरीवर परिणाम झाला. कंपनी आता प्रवासी आणि व्यावसायिक व्यवसायावर भर देणार असल्याचे सांगण्यात आले. लँड रोव्हरचे उत्पन्न 5.6 अब्ज पौंडवर पोहोचले असून त्यात 244 दशलक्ष पौंडने वाढ झाली.

Related posts: