|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » जय मराठा

जय मराठा 

प्रतिनिधी/ मुंबई

मुंबईतील महामोर्चात राज्यभरातील मराठा बांधव सहभागी झाले होते. या 58 व्या मूकमोर्चा वेळीही रिकाम्या हाताने परत फिरावे लागेल की काय या शंकेने आझाद मैदानात पोहोचल्यावर समाजाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. देश स्वातंत्र्य झाल्यापासून या समाजाकडे वारंवार होणाऱया दुर्लक्षाची धगधगती आग प्रत्येकाच्या मनात होती. ही आग मनात ठेवूनच प्रत्येकजण चालत होता.

मराठा समाजाकडून राज्यभरात अद्यापपर्यंत 57 मोर्चे काढण्यात आले असून हा 58 वा मोर्चा आहे. त्यामुळे मोर्चात अधिकाधिक समाजबांधव उपस्थित राहील याची काळजी घेण्यात आली होती. जिल्हाजिल्हय़ात झालेल्या मोर्चात लाखोंची गर्दी होती. मात्र, मुंबईतील मोर्चाला कोटय़वधी मराठा उप†िस्थत राहण्याची मोर्चेबांधणी आधीपासूनच करण्यात आली होती. सोशल मीडिया, बॅनरबाजी, मराठा समाजाच्या पारंपरिक परिधानाकडेही विशेष आकर्षित करून समाजाला जागृत करण्यात आले होते. त्याचे प्रत्यंतर बुधवारच्या मोर्चात आले.

पहाटेपासूनच मोर्चाच्या रांगा…

भायखळा येथील राजमाता जिजामाता उद्यानात मराठा समाज मुंबईत मंगळवारी सायंकाळपासून दाखल होत होता. यात अबालवफद्ध, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांची लक्षणीय संख्या होती. 

मोर्चाचे नेतृत्व महिला आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱयांच्या मुलांकडे

सकाळी पावणेअकराला मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चाच्या पुढे जिजाऊ, शिवाजी महाराजांच्या वेशात मुले होती. तर त्यामागे आत्महत्या केलेल्या शेतकऱयांची मुले,  तर त्यांच्या मागे महिला मोठय़ा प्रमाणात होत्या. जिजामाता उद्यान भायखळा ब्रिज पुढे जेजे उड्डाणपूल करत सीएसएमटीकडे मोर्चा सरकत होता. जेजे उड्डाणपुलादरम्यान पावसाची हलकी सर झाली. यावेळी घोषणाबाजी करत असलेल्या मोर्चेकऱयांना आवरणे आयोजकांनाही कठीण होऊन बसले होते. जेजे उड्डाणपूल ते सीएसटीदरम्यान 15 विविध मुस्लीम संघटना पाठिंब्यासाठी उतरल्या होत्या. मराठा मोर्चाला पाठिंबा देताना मोर्चाचे बॅनर फडकविण्यात येत होते. लहान मुलांचा सहभाग अभूतपूर्व होता.

 

यावेळी पाणी आणि खाऊची पाकिटे वाटण्यात येत होती. तर काही मुस्लीम ज्येष्ठ नाग†िरक पाण्याचे रिकामे प्लास्टिक ग्लास, बाटल्या आणि इतर कचरा गोळा करतानाही आढळले. मुस्लीम कौन्सिलचे सदस्य मोर्चेकऱयांचे स्वागत करत होते.

काय बोलल्या तरुणी?

आरक्षण नसल्याने मराठा समाजातील विद्यार्थ्यांना गुणवत्ता असूनही प्रवेश मिळत नाही. मराठा समाजाला आरक्षण देता की जाता? मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे!