|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » क्रिडा » हॅडीन ऑस्ट्रेलियाचा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक

हॅडीन ऑस्ट्रेलियाचा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक 

वृत्तसंस्था /सिडनी :

ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटीवर आणि यष्टीरक्षक ब्रॅड हॅडीनची ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी ग्रेग ब्लिवेट ऑस्टेलियाचा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक होता. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हॅडीनसमवेत नुकताच करार केला असून 2019 अखेर हॅडीनकडे क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. हॅडीनने आपल्या क्रिकेट कारकीर्दीत 66 कसोटीत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधीत्व केले आहे. 39 वर्षीय हॅडीन आता प्रमुख प्रशिक्षक डरेन लिंमन यांच्यासमवेत ऑस्ट्रेलियन संघाला मार्गदर्शन करेल.