|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » leadingnews » दिल्लीत विरोधी पक्षांची आज महत्त्वपूर्ण बैठक

दिल्लीत विरोधी पक्षांची आज महत्त्वपूर्ण बैठक 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली आज 18 विरोधी पक्षांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली आहे. ही बैठक सायंकाळी साडेचार वाजता संसद भवन परिसरात पार पडणार आहे. या बैठकीत विविध मुद्यांवर सरकारला घेरण्याची रणनीती आखण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

केंद्र सरकारकडून विरोधकांना आपली बाजू मांडण्यासाठी परवानगी न दिली जाणे, यांसारख्या विविध मागण्यांबाबत काँग्रेससह 18 विरोधी पक्षांची महत्त्वपूर्ण बैठक आज होणार आहे. ही बैठक देशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली होणार आहे. या बैठकीसाठी तृणमूल काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, राष्ट्रवादी काँग्रेस, झारखंड मुक्ती मोर्चा, समाजवादी पक्ष, बहुजन समाजवादी पक्ष, राष्ट्रीय लोकशाही आघाडी याशिवाय अन्य विरोधी पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दरम्यान, संयुक्त जनता दलाचे नेते शरद यादव यांनाही या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे ते या बैठकीला उपस्थित राहतात की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Related posts: