|Sunday, August 25, 2019
You are here: Home » Top News » अमित शहांकडून जेडीयूला एनडीएत सामील होण्याचे निमंत्रण

अमित शहांकडून जेडीयूला एनडीएत सामील होण्याचे निमंत्रण 

ऑनलाईन टीम / लखनौ :

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि नवनिर्वाचित राज्यसभा खासदार अमित शाह यांनी संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सामील होण्याचे निमंत्रण दिले असल्याची माहिती मिळत आहे.

शुक्रवारी नितीशकुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर लगेचच आज अमित शाह यांनी नितीशकुमार यांना एनडीएमध्ये सामील होण्याचे निमंत्रण दिले आहे. दरम्यान, संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीशकुमार यांना एनडीएमध्ये सामील होण्याचे निमंत्रण दिल्याचे अमित शाह यांनी स्वतः सांगितले आहे.