|Tuesday, November 19, 2019
You are here: Home » leadingnews » तुम्हाला सुरक्षित वाटते तिथे जा ; संघाचा अन्सारींना सल्ला

तुम्हाला सुरक्षित वाटते तिथे जा ; संघाचा अन्सारींना सल्ला 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारींनी केलेले वक्तव्य मुसलमान समाजातही ऐकणारे कोणी नाही. त्यांचे वक्तव्य दुर्दैवी आहे. त्यांना जिथे सुरक्षित वाटते अशा एखाद्या देशात गेले पाहिजे, असा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी दिला.

राष्ट्रीय मुस्लिम मंचाच्या वतीने आयोजित राखी पौर्णिमेनिमित्त इंद्रेश कुमार बोलत होते. माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी आपल्या पदावरुन पायउतार होताना देशातील मुसलमान सुरक्षित नसल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली. यातच आरएसएस नेते कुमार यांनी त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला. ते म्हणाले, अन्सारींनी त्यांना जिथे सुरक्षित वाटते, अशा देशात गेले पाहिजे. अन्सारी हे पूर्वी भारतीय होते. आता ते जातीयवादी झाले आहेत. ते पूर्वी सर्वपक्षीय नेते होते. पण आता ते काँग्रेसवादी झाले असल्याची टीका त्यांनी केली.

Related posts: