|Saturday, January 25, 2020
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

13 ते 19 ऑगस्ट 2017

मेष

रवि, ग्रहाचे राश्य़ांतर आपला आत्मविश्वास वाढविणार आहे. कला, क्रीडा क्षेत्रात नवीन संधी मिळणार आहे. नोकरीत थोडा त्रास असला तरी घाईत नोकरी  बदलण्याचा निर्णय घेऊ नका. पुढे काळ चांगला आहे. चांगली संधी मिळेल. व्यवसायात प्रगती संभवते. या आठवडय़ात महत्त्वाची कामे पूर्ण करा. शेतीच्या कामात यश मिळेल. धाडसी निर्णय घेऊ नका. प्रकृतीची काळजी घ्या. दु:खापत होण्याची शक्मयता आहे. शनिवारी जीवनसाथीबरोबर चहाच्या पेल्यातील वादळे संभवतात. राजकीय क्षेत्रात, मानसन्मानाचा योग येईल.


वृषभ

शेतकरी वर्गाला कष्ट घ्यावे लागतील. फायदा होईल, पण खर्चही वाढेल. नोकरी धंद्यामुळे कुटुंबापासून दूर राहण्याचा योग येऊ शकतो. रविचे राश्य़ांतर या आठवडय़ात होत आहे. गुंतवणूक करताना काळजी घ्या. विद्यार्थीवर्गाने प्रकृतीची काळजी घ्यावी. फास्टफूडच्या नावाने पोटाचा विकार होईल. कोणत्याही क्षेत्रात भलते जीवावर बेतणारे धाडस करू नये, महिलांनी प्रकृतीची काळजी घ्यावी. पोटाचा त्रास संभवतो. गुरुवारपासून तणाव कमी होईल. प्रगतीच्या मार्गातील अडचणी कमी होतील. परदेशात व्यवसाय वाढू शकतो.


मिथुन

आठवडय़ाची सुरुवात चांगली जाणार आहे. प्रिय व्यक्तीच्या भेटीगाठी संभवतात. स्पष्ट बोलणे, कधीकधी तुम्हाला त्रासदायक ठरते. मुलांचे अति लाड करू नका. कौटुंबिक सुखात भर पडेल. बुधवार, गुरुवार नोकरीत कामाचा ताण वाढण्याची शक्मयता आहे. खोटे आरोप होऊ शकतात. विद्यार्थीवर्गाने आळस केला तर अपयशाला तोंड द्यावे लागेल. मानसिक, शारीरिक त्रास शुक्रवारनंतर कमी होईल. आध्यत्मिक शक्ती वाढविण्याचा प्रयत्न करा. राजकीय क्षेत्रात आपले डावपेच यशस्वी ठरतील. कठोर निर्णय घ्यावे लागतील. मनातील काही शंका दूर करण्याचा प्रयत्न करा. जवळच्या व्यक्तीकडे मन मोकळे करा.


कर्क

नोकरीत, घरात, कामाचा व्याप वाढल्याने थोडी चिडचिड संभवते. पण आपण कामे वेळेवर पूर्ण करू शकाल. थोरामोठय़ांच्या ओळखी होतील. शेतीच्या कामात नवीन तंत्राचा किंवा केमिकलचा वापर करताना पूर्ण विचार करा. शेअर्स उलाढालीत फायदा संभवतो. आपल्या मुलांच्यावर प्रेम करणे म्हणजे त्यांचे फक्त लाड करणे, असे नसून त्यांच्या चुका पोटात न घालता त्यांना त्यांची जाणीव करून देणे हे फार महत्त्वाचे असते तरच मुलांशी दिशाभूल टळते. नवीन घर खरेदी करू शकाल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आताच महत्त्वाचे निर्णय घ्या. पण ठोस आश्वासने देऊ नका.


सिंह

सिंह राशीत सूर्याचे राश्यांतर तुमच्या क्षेत्रातील अडचणी दूर करणार आहे. या सप्ताहात तुमचा उत्साह वाढेल. प्रति÷ा वाढेल. तुमचे मुद्दे राजकीय, सामाजिक क्षेत्रात पटवून देता येतील. संसारातील समस्या किंवा वाटाघाटीचा प्रश्न याच आठवडय़ात चर्चा करून मिटवता येईल. कोर्टकेसमध्ये मदत मिळेल. तुमच्यावरील आरोप दूर करण्याचा प्रयत्न करा. धंद्यात जम बसेल. संयमाने बोला. सर्वाच्या विचारांचा आदर करा. कला, क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळेल. आर्थिक लाभ मिळेल. शिक्षणात चांगली प्रगती मिळेल.


कन्या

चंद्र, शुक्र लाभयोग व सिंहेत सूर्य प्रवेश करीत आहे. रविवार, सोमवार धंद्यात समस्या येतील. तणाव वाढवू नका. राजकीय, सामाजिक कार्यात पुढाकार घ्यावा लागेल. तडजोड करावी लागेल. कोर्ट केसमध्ये अडचणी वाढणार नाही. याची काळजी घ्या. कठोर शब्द व अहंकाराची वागणूक करून तुमच्याबद्दल गैरसमज होईल. कला क्रीडा क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. कदाचित तुमच्या कामाचे कौतुक विलंबाने होईल. शिक्षणात वाकडय़ा वाटेने जाऊ नका. विवाहासाठी स्थळे मिळतील. शुभ दि. 15, 18.


तुळ

सिंहेत सूर्याचे राश्यांतर व चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. संसारातील तणाव कमी होऊन चांगल्या घटना घडतील. साडेसाती 26 ऑक्टो.ला संपणार आहे. धंद्यात जम बसेल. फायदा मिळेल. नोकरीतील तणाव कमी होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आशादायक वातावरण राहील. वरि÷ तुमचे विचार ऐकून घेतील. कला, क्रीडा क्षेत्रात मन रमेल. प्रति÷ित व्यक्तींचा सहवास मिळेल. नवीन मित्र मिळतील. शिक्षणात कष्टाने पुढे जाता येईल.


वृश्चिक

या सप्ताहात तुम्ही ठरविलेल्या कार्यक्रमात  बदल करण्याचे वेळ येईल. संयम ठेवा. दुसऱयाचे मत ऐकून घ्या. आळसाने कामे अर्धवट राहतील. संसारात थट्टा-मस्करी करताना भान ठेवा. भावना समजून घ्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वर्चस्व वाढले तरी विरोधक प्रश्न निर्माण करतील. कोर्टकेस सावधानी ठेवल्यास यश मिळेल. धंद्यात, शेअर्समध्ये अंदाज घेताना घाई नको. खाण्याची काळजी घ्या.


धनु

चंद्र, शुक्र लाभयोग व सिंहेत सूर्याचे राश्यांतर होत आहे. सर्वच ठिकाणी येणाऱया समस्या थोडय़ा प्रमाणात कमी होतील. वाहन जपून चालवा. बुधवार, गुरुवार यांत्रिक खर्च होण्याची शक्मयता आहे. हायब्लडप्रेशरचा त्रास होऊ शकतो. क्रीडा क्षेत्रात दुखापत संभवते. राजकीय, सामाजिक कार्यातील तुमचे वर्चस्व वाढेल. लोकप्रियता वाढवण्यात यश मिळेल. शिक्षणात पुढे जाता येईल.


मकर

सप्ताहाच्या सुरुवातीला महत्त्वाची कामे करा. सिंहेत सूर्याचे राश्यांतर व चंद्र गुरु त्रिकोणयोग होत आहे. कुटुंबात तुमच्या मनाविरुद्ध घटना घडण्याची शक्मयता आहे. वाटाघाटीतून तणाव होऊ शकतो. जवळच्या माणसाची प्रकृती सांभाळा. राजकीय, सामाजिक कार्यात वाद होतील. अहंकार ठेऊन केलेले वक्तव्य स्फोटक ठरेल. विरोधक आक्रमक होतील. कलाक्रीडा क्षेत्रात दुखापत संभवते. कोर्टकेसमध्ये अडचणी वाढतील. धंद्यात सौम्य धोरण ठेवा. म्हणजे नुकसान टाळता येईल.


कुंभ

सिंहेत सुर्याचे राश्यांतर व शुक्र, प्लुटो प्रतियुती होत आहे. वातावरणातील तणाव सर्वच ठिकाणी कमी होण्यास सुरुवात होईल. कुटुंबातील जबाबदारी वाढली तरी सर्वांचे सहाय्य मिळेल. प्रवासात मंगळवार, बुधवार सावध रहा. दहिहंडीमध्ये धाडस नको. दुखापत संभवते. कोर्टकेसमध्ये मदत मिळू शकेल. धंद्यात सुधारणा होईल. राजकीय, सामाजिक कार्यात समोरच्या व्यक्तीचे विचार समजून घ्या व संयमाने उत्तर द्या. शनिवारी तुमचा प्रभाव वाढेल.


मीन

महत्त्वाचा निर्णय व भेट लवकरच करून घ्या. समस्या सोडवण्यास वेळ लावू नका. जमिनी, घर, इ. व्यवहार पूर्ण करा. खरेदी, विक्रीत बुधवारपर्यंत फायदा जास्त होईल. सूर्याचे राश्यांतर व चंद्र, गुरु त्रिकोण योग होत आहे. संसारात  आनंदी वातावरण राहील. राजकीय, सामाजिक कार्यात पुढाकार घ्यावा लागेल. कुणालाही अपशब्दाने बोलू नका. यश मिळवता येईल. थोडी सहनशीलता ठेवल्यास गुप्त कारवारांना शह देता येईल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल.

Related posts: