|Sunday, January 26, 2020
You are here: Home » क्रिडा » मराठा योद्धास सुपर लीग मुष्टीयुद्ध स्पर्धेत विजेता

मराठा योद्धास सुपर लीग मुष्टीयुद्ध स्पर्धेत विजेता 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

येथील सिरी फोर्ट स्क्वॅश आणि बॅडमिंटन स्टेडियममध्ये झालेल्या पहिल्या सुपर लीग मुष्टीयुद्ध स्पर्धेचे अजिंक्यपद मराठा योद्धास संघाने पटकाविले. अंतिम लढतीत मराठा योद्धासने हरियाना वॉरियर्सचा 10-9 अशा गुणांनी निसटता पराभव केला.

या अंतिम फेरीमध्ये मराठा योद्धास संघातील संदीप सिंग आणि अँडी चुआ यांनी आपल्या पहिल्या दोन लढती जिंकून हरियानावर 6-0 अशी आघाडी मिळविली. त्यानंतर हरियाना वॉरियर्सच्या सुमन कुमारी, संदीप नैन आणि सुखदीप सिंग यांनी आपल्या लढती जिंकून मराठा वॉरियर्सवर 9-6 अशी आघाडी घेतली. त्यानंतर शेवटच्या लढतीत संदीप चिकराने हरियाना वॉरियर्सच्या मुष्टीयोद्धय़ाला तांत्रिक गुणांवर पराभूत करून मराठा वॉरियर्सला या स्पर्धेचे अजिंक्यपद मिळवून दिले. मान्यवरांच्या हस्ते मराठा योद्धास संघाला सुपर बॉक्सिंग लीग चषक देण्यात आला.

Related posts: