|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » लोकसहभाग असेल तर सरकार पाठीशी : डॉ.राजेंद्रसिंह राणा

लोकसहभाग असेल तर सरकार पाठीशी : डॉ.राजेंद्रसिंह राणा 

पंढरपूर / प्रतिनिधी

भीमा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी फ्ढक्त सरकारच उपयोगी पडणार नाही. याकरिंता नागरिक, विद्यार्थी, वारकरी भक्त अशा समाजांचे देखिल योगदान महत्वाचे आहे. लोकसहभाग वाढला तर सरकार देखिल नदी शुध्दीकरण करण्यासाठी अधिक पाठीशी राहील, अशी अपेक्षा जलतज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी व्यक्त केले आहे.

नमामि चंद्रभागा अभियानांतर्गत जलसाक्षरता यात्रा आज पंढरपूरात पोहोचली होती. जलबिरादरी या संस्थेच्या वतीने उगमापासून ते संगमापर्यत यात्रा होणार आहे. हीच यात्रा पंढरपूरात आली होती. यावेळी कर्मयोगी प्रतिष्ठान आणि पंढरपूरकरांच्या वतीने या जलसाक्षरता दिंडीचे स्वागत करण्यात आले.

यावेळी डॉ. राजेंद्रसिंह म्हणाले, चंद्रभागा नदी ही वारकरी भाविकांच्या मोठया श्रध्देचे स्थान आहे. यामधेच प्रदूषण मोठे आहे. मूलतः प्रदूषण हे नद्यांचे शत्रू आहे. उगमापासून नदीपात्रात सांडपाणी, कचरा जाणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे. याकरिंता लोकसहभागातून जलसाक्षरता करणे आणि त्याहीपेक्षा प्रत्यक्ष नद्यांचे शुध्दीकरण करणे हे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

चंद्रभागा ही कुठल्या डोंगर आणि द-यामधून उगम पावत नाही. भीमाशंकर सारख्या जंगलामध्ये नदी उगम पावते. त्यामुळे निश्चित स्वरूपात नद्यांचे आणि वृक्षांचे हे वेगळे नाते आहे. नमामि अभियान राबवताना. या अभियानामध्ये मोठया संख्येने वृक्षांची लागवड अधिक होणार आहे. कारण वृक्ष हे पाणी निर्माण करण्याचे एक महत्वाचे साधन आहे. नमामि चंद्रभागा अभियानांतर्गत नद्यांचे शुध्दीकरण करण्यासाठी प्रत्येकांने कार्य केले पाहीजे. याकरिताच वारकरी महाराज मंडळी यांचे देखिल प्रबोधन महत्वाचे ठरणार आहे. कारण सांप्रदायिक मंडळी पुढे आली. तर समाज पुढे येईल.

शहरामध्ये सकाळी ही जलसाक्षरता दिंडी आल्यावर येथील शिवाजी चौकांमधून विविध शाळा, महाविद्यालये यांच्या विद्यार्थ्यासह जलसाक्षरता दिंडी शहरामधून काढण्यात आली. ही दिंडी संपूर्ण प्रदक्षिणा मार्गावर फ्ढिरली. यानंतर महाव्दार घाटांवर जलकुंभाचे पूजन करण्यात आले. तसेच चंद्रभागेची सामुदायिक आरती देखिल करण्यात आली. प्रसंगी मोठया संख्येने मान्यावर हे उपस्थित होते.

   यानंतर येथील तुकाराम भवन येथे देखिल या पंढरपूरातील दिंडीचा समारोप करण्यात आला. यावेळी सुधाकरपंत परिचारक, आ. प्रशांत परिचारक, नगराध्यक्षा साधना भोसले, उपनगराध्यक्षा सुजाता बडवे, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर आदि यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी पंढरपूरकरांच्या वतीने आ. प्रशांत परिचारक यांनी जलदिंडीचे विठ्ठलाची मूर्ती देऊन स्वागत केले.

   12 नद्या आणि 6 उपनद्यांचे जलकुंभ

   जलसाक्षरता दिंडीच्या माध्यमातून 12 नद्या आणि 6 उपनद्यातील पाण्याचा जलकुंभ हा तयार करण्यात आलेला आहे. हा जलकुंभ संपूर्ण दिंडीमधे विजापूर पर्यत घेऊन जाणार आहे. त्यामुळे या कलशातील पाण्याच्या माध्यमातून ख-या अर्थाने हे आगळी वेगळी दिंडी असताना दिसून येणार आहे.

   जलप्रतिज्ञाने गजबजली नामदेव पायरी

जलसाक्षरता दिंडी संपूर्ण प्रदक्षिणा मार्गावर जाऊन आली. यानंतर महाव्दारावर जलपूजन झाले. चंद्रभागेची आरती झाली. यानंतर विद्यार्थ्यासह सर्वच नागरीक मान्यवर हे नामदेव पायरी येथे आले. याठिकाणी जलप्रदूषण रोखण्यासंबधीची जलप्रतिज्ञा दिली. एकाचवेळी हजारो विद्यार्थ्यानी ही प्रतिज्ञा घेतल्यामुळे नामेदव पायरीचा सारा परीसर हा गजबजून गेलेला दिसून आला.

Related posts: